अक्कलकोटमधील नऊ ग्रामपंचायती बिनविरोध ! मोठ्या गावांत पारंपरिक लढती मात्र कायम 

Randhumali
Randhumali

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील जाहीर झालेल्या एकूण 72 ग्रामपंचायत निवडणुकींपैकी नऊ ग्रामपंचायती पूर्ण बिनविरोध झाल्या असून, उर्वरित अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्यांची अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी अविरोध निवड झाली आहे. आता येत्या 15 जानेवारीस यासाठी गावागावात निवडणूक होत असून त्याचा निकाल मात्र 18 जानेवारीला लागणार आहे. 

अक्कलकोट तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 634 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी एकूण 1825 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 673 जण माघार घेतले असून 980 जण रिंगणात आहेत. एकूण 634 पैकी 172 सदस्य बिनबिरोध निवडले गेले आहेत. त्यात गळोरगी एक, शेगाव आठ, गुड्डेवाडी सहा, संगोगी (अ) एक तसेच हालहळ्ळी एक अशा सदस्यांचाही समावेश आहे. 

अक्कलकोट तालुक्‍यात होत असलेल्या 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 70 हजार 553 पुरुष तर 63 हजार 879 स्त्री असे एकूण 1 लाख 34 हजार 439 मतदार या ग्रामपंचायत निवडणुकीत भाग घेऊन आपले गावकारभारी येत्या पाच वर्षांसाठी निवडणार होते. पण आता बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती व इतर सदस्यांची निवडणूक न होता उर्वरित जागांसाठी निवडणुकीचा फड रंगणार आहे. आता वागदरी, नागणसूर, चपळगाव, जेऊर, हैद्रा, गौडगाव (बु), कुरनूर आदी अनेक मोठ्या गावांत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील लढती रंगणार आहेत. 

गावनिहाय बिनविरोध सदस्य पुढीलप्रमाणे आहेत 

  • उडगी (गाव बिनविरोध) : गिरीजा कलप्पा यळमेली, मल्लम्मा सायबण्णा पाटोळे, इरण्णा निळकंठ गायकवाड, निंगम्मा बसवराज कोळी, जगदेवी शटेप्पा धानशेट्टी, वालूबाई रमेश जाधव, सुनील खंडेराव मोरे, लक्ष्मीबाई नागण्णा म्हेत्रे. 
  • आंदेवाडी (बु) (गाव बिनविरोध) : सोमण्णा मल्लिकार्जुन कलशेट्टी, शिल्पा इरप्पा कुंभार, आरती प्रसन्ना कांबळे, श्रीमंत भरमण्णा यळमेली, सिद्धप्पा कलप्पा यळमेली, सविता मनोहर पुजारी, तेहशीन रमजान मणुरे, बसवराज श्रीशैल दुर्ग, कलप्पा इरण्णा पाटील. 
  • कुमठे (गाव बिनविरोध) : चेतन शिवानंद पाटील, राजश्री अशोक हल्लोळी, खाजेबाई बडेशा नदाफ, शारदाबाई हणमंत कोटगी, रत्नव्वा शिवानंद पाटील, म्हाळप्पा तिपण्णा शिंदे, जयश्री कलप्पा मैंदर्गी. 
  • नागनहळ्ळी (गाव बिनविरोध) : कमलाबाई पापा राठोड, स्वप्नाली रूपसिंग राठोड, शशिकला काशिनाथ राठोड, आबिदाबी नज्जू सय्यद, रमेजा सैपन शेख, बाबू बंदू मुजावर, महानंदा जगन्नाथ टेंगळे, अहमदपाशा अब्दुलगफूर शेख. 
  • तोळणूर (गाव बिनविरोध) : प्रीती वालीकर, विजयालक्ष्मी हुलमनी, संजीवकुमार व्हरकेरी, श्रीदेवी मनगुळी, प्रवीण रब्बा, सिद्रामप्पा पाटील, मल्लिनाथ म्हेत्रे, इंदुमती माळी, ज्योती फुलारी, शांता हुलमनी, वीरभद्रप्पा उप्पीन. 
  • मातनहळ्ळी (गाव बिनविरोध) : साहेबलाल महिबूब मुजावर, ज्योती श्रीरंग जाधव, चंद्रशा भोजप्पा बनसोडे, रेश्‍माबी रफिक जमादार, रकमाबाई सिद्राम बनसोडे, मंगल राहुल राठोड, सुनील वालचंद चव्हाण. 
  • हंद्राळ (गाव बिनविरोध) : मल्लिकार्जुन खंडप्पा काटगाव, सविता राजकुमार गायकवाड, गंगाबाई अंबण्णा तळवार, लक्ष्मीबाई गणपती हल्लोळी, रेवणसिद्ध शेटप्पा तडवळ, इरण्णा ईश्वरप्पा पुजारी, जयश्री गुरुपादप्पा तुप्पद. 
  • बणजगोळ : सविता पाटील, महादेव बनसोडे, श्रीदेवी सनदी, नागाबाई व्हसुरे, रत्नमाला मुळे, बसवंत मुळे, राम मातोळे, स्वाती चव्हाण, जान्हवी कुंभार. 
  • शिरसी (गाव बिनविरोध) : राजेश राठोड, मंगल पाटील, सोजर इंगळे, लक्ष्मी इंगळे, सुनंदा व्हनशेट्टी, राचय्या स्वामी. 
  • पितापूर : पूजाबाई सुरेश व्हनमाने, कल्पना गिरीधर शिंगाडे, सदाशिव अण्णाराव पांढरे, पंडित नामदेव देडे, मोहसीना अब्दुलकादर सगरी, शाहीन अ. सुकूर सगरी. 
  • सिन्नूर : कल्पना बागशीरप्पा सोनकांबळे, जगदीश विठ्ठल उजनी, कुलसुबी नबीलाल पाटील, शेखर जाफर मुल्ला, अर्जुन लिंगराज हौदे, उस्तूमखॉं नवाजखॉं पठाण, अंबाबाई परशुराम गायकवाड. 
  • आंदेवाडी खुर्द : रेणुका कृष्णात कामाठी, लक्ष्मी लक्ष्मण कामाठी, अर्चना लक्ष्मण कामाठी, अंबूबाई शिवण्णा नाशिवाडे, राजश्री सिद्राम कामाठी. 
  • मिरजगी : भीमण्णा धर्मण्णा पाटोळे 
  • कर्जाळ : आशा चंद्रकांत इंगळे, रंजना लोकप्पा इंगळे 
  • बागेहळ्ळी : निर्मला सिद्राम माडजे 
  • डोंबरजवळगे : गौराबाई चंद्रकांत उदगिरी, गीतांजली विवेकानंद नारायणकर, दीपाली आनंद गायकवाड 
  • किणीवाडी : सुरेखा गुरण्णा खोसणे 
  • कल्लहिप्परगे : प्रियांका प्रशांत कोळी 
  • मराठवाडी : रेखा लाडप्पा बेळ्ळे, तुळसाबाई तुळजाराम गाजरे, गंगप्पा काशीराया वाघे 
  • वागदरी : महानंदा शंकर सावंत 
  • चिकेहळ्ळी : प्रीती इरण्णा दसाडे, यादव्वा अंबादास झळके 
  • चिंचोळी (मै) : आंबव्वा मारुती सोनकांबळे, कुलसुबी सैपन नदाफ 
  • मुगळी : गफूर खासीम जमादार 
  • तडवळ : संतोष गंगाधर कुंभार 
  • मुंढेवाडी : अंबिका विठ्ठल अतगोंडा, अनिता मडिवाळप्पा कलशेट्टी 
  • हन्नूर : मुक्ताबाई चंद्रकांत ढगे, सोनाली सिद्धप्पा तळवार, शैलेंद्र कलप्पा पाटील, सागर सिद्धप्पा कल्याणशेट्टी. 
  • तोरणी : फुलाबाई खंडप्पा बनसोडे, जगदेवी घाळेप्पा कोळी, गंगाबाई सुभाष बिराजदार, चंद्रशा आनंदराव जिरोळे. 
  • दोड्याळ : रेवप्पा अर्जुन नडगम, कविता दत्तात्रय नडगम, विमल विलास गव्हाणे, सुनंदा स्वामीनाथ अवताडे, स्वामीनाथ बसवराज कोळी, अश्विनी नितीन महाडकर, रिजवाना अदिल जमादार. 
  • गोगाव : महादेवी होळे 
  • भुरीकवठे : मीलन बनसोडे, हणमंत पात्रे. 
  • खैराट : सुनंदा मठपती 
  • देवीकवठे : मल्लेशी कोळी, प्रियांका क्षेत्री. 
  • मोट्याळ : हलिमा फुलारी 
  • बोरोटी खुर्द : उषाबाई नंदीवाले, लक्ष्मी चव्हाण, तुकाराम कोळी 
  • चप्पळगाव : गौराबाई आचलेरे, धनश्री वाले, मल्लिनाथ सोनार. 

हंजगीतून सर्व उमेदवारी अर्ज मागे 
हंजगी ग्रामस्थांनी बैठक घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध करायचा निश्‍चय केला होता. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक - दोघांच्या उमेदवारी काढण्याबाबत एकमत न झाल्याने सर्वच 16 पैकी 14 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. सर्व गावच विरोधात गेल्याने राहिलेल्या दोघांनीही अर्ज मागे घेतले व सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणात एकही उमेदवार राहिला नाही, अशी माहिती हंजगीचे निवडणूक निर्णय अधिकारी उमेश काटे यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com