नाट्यपरिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध

 The election of a dramatist is unopposed
The election of a dramatist is unopposed
Updated on

सोलापूर : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या उपनगरीय शाखेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यास अखेर यश आले. परिषदेच्या 19 जागांसाठी 34 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, 15 उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने ही निवडणुक बिनविरोध करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र शेंडगे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटेश गाजूल यांनी दिली. 

निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो. अखिल भारतीय नाट्य परिषद उपनगरीय शाखेच्या निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते ते सर्व उमेदवार कलाकार आहेत. त्यांना हा निवडणुकीचा खर्च परवडणार नाही यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नाट्य परिषदेचे सल्लागार दिलीप कोल्हे, दिलीप पानसे, अनिल पानसे, नंदकुमार मुस्तारे, प्रशांत बडवे यांनी परिश्रम घेतले. 

दरम्यान, नाट्यपरिषदेच्या अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड शनिवारी (ता. 7) होणार आहे. अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष विजयकुमार साळुंखे यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


यांची झाली बिनविरोध निवड 
गुरूनाथ वठारे, किरण लोंढे, विजयकुमार साळुंखे, शोभा बोल्ली, सुशांत कुलकर्णी, कृष्णा हिरेमठ, प्रशांत शिंगे, राजासाहेब बागवान, अशुतोष नाटकर, अनुजा मोडक, मीरा शेंडगे, शशिकांत पाटील, अमोल राजमाने, दिनेश शिंदे, संदीप जाधव, मनीषा जोशी, नरेंद्र गंभिरे, प्रसाद कुलकर्णी. 

यांनी घेतली माघार 
शिवाजी उपरे, श्रुती मोहोळकर, वल्लभ सांजेकर, विश्‍वास पाळंदे, पंचप्पा मेणसे, नागनाथ पाटील, रूद्रा अंबादास, अनिल पानसरे, सचिन पुराणिक, दिनेश रसाळ, आनंद मुस्तारे, इम्तियाज मालदार, महेश निकंबे, राजेश जाधव. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com