विषय समित्यांच्या निवडी होणार बिनविरोध ! भाजपला तीन समित्या तर...

तात्या लांडगे
Monday, 26 October 2020

राष्ट्रवादी अन्‌ 'वंचित'ने मागितली स्वतंत्र समिती
महापालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध व्हावी, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडी अंतिम होताना काही गटनेत्यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे तशी मागणी केली होती. त्यानुसार शिवसेना, कॉंग्रेस, एमआयएमला प्रत्येकी एक तर राष्ट्रवादी आणि वंचित बहूजन आघाडी या दोघांत एक समिती आणि उर्वरित तीन समित्या भाजपकडे ठेवाव्यात, अशी चर्चा झाली. मात्र, राज्यातील सत्तेत दोन नंबरवरील पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आम्हाला स्वतंत्र समिती द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे. तर वंचित बहूजन आघाडीनेही स्वतंत्र समिती मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोघांमधील पेच आगामी काही दिवसांत न सुटल्यास भाजप एक पाऊल मागे घेणार का मतदान घ्यावे लागणार, याकडे लक्ष लागले आहे.

सोलापूर : महिला बालकल्याण, स्थापत्य, न्याय व विधी, शहर सुधारणा, समाजकल्याण, आरोग्य आणि उद्यान या विषय समित्यांच्या 63 सदस्यांच्या निवडी अंतिम झाल्या आहेत. त्यात शिवसेना, कॉंग्रेस, एमआयएमला प्रत्येकी एक समिती, तर भाजपकडे तीन समित्या आणि वंचित बहूजन आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक समिती देऊन सभापती निवड बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, वंचित बहूजन आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येकी एक समिती मागितल्याने तो पेच सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुसरीकडे पक्षनिहाय समित्यांची अपेक्षाही जाणून घेतली जात झाल्याची चर्चा आहे. पुढील महिन्यात सभापती निवडी होणार आहेत.

राष्ट्रवादी अन्‌ 'वंचित'ने मागितली स्वतंत्र समिती
महापालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध व्हावी, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडी अंतिम होताना काही गटनेत्यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे तशी मागणी केली होती. त्यानुसार शिवसेना, कॉंग्रेस, एमआयएमला प्रत्येकी एक तर राष्ट्रवादी आणि वंचित बहूजन आघाडी या दोघांत एक समिती आणि उर्वरित तीन समित्या भाजपकडे ठेवाव्यात, अशी चर्चा झाली. मात्र, राज्यातील सत्तेत दोन नंबरवरील पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आम्हाला स्वतंत्र समिती द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे. तर वंचित बहूजन आघाडीनेही स्वतंत्र समिती मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोघांमधील पेच आगामी काही दिवसांत न सुटल्यास भाजप एक पाऊल मागे घेणार का मतदान घ्यावे लागणार, याकडे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी भाजपने विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी निवडणूक घेण्याऐवजी सामोपचाराने तोडगा काढावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तत्पूर्वी, सर्व गटनेत्यांनी त्यांच्या पक्षातील नगरसेवकांची नावे सदस्यपदासाठी दिली आहेत. त्यानंतर भाजपने स्वत:कडे तीन समित्या ठेवून उर्वरित समित्या विरोधकांना द्याव्यात, अशी मागणी आहे. मात्र, महापौर श्रीकांचना यन्नम यांनी शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे हा प्रस्ताव पाठविल्याची चर्चा आहे. त्यावर अद्याप निर्णय झाला नसून पक्षाचे आमदार व पदाधिकाऱ्यांमध्ये विचारविनिमय सुरु आहे. दुसरीकडे सर्व विरोधक एकत्र झाल्यास भाजपला एकही समिती मिळणार नाही, असेही चित्र आहे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विषय समित्या सदस्यपदी वंचित बहूजन आघाडीचे तीन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, एमआयएम व कॉंग्रेसचे प्रत्येकी सात आणि उर्वरित सदस्य शिवसेना व भाजपचे आहेत. विरोधकांच्या सदस्यांची संख्या भाजपच्या तुलनेत अधिक असल्याने आता भाजप काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election of subject committees will be unopposed ! BJP has three committees