वाहनांशी जोडलेले भावनिक नातेही ठऱते अधिक मोलाचे

startup.jpg
startup.jpg

सोलापूर ः वाहनाशी असलेले भावनिक नात्यातून गाडी सांभाळणाऱ्यांच्या गाडीची देखभालीसह आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांची सर्वात मोठी अडचण होते. त्यांना गाडीची रिसेल करण्याची करायची नसते. मात्र रिस्टोअरेशनच्या अभावाने हा ग्राहक गाडीच्या बाबतीत अडचणीत सापडतो. 
दुचाकी किंवा चारचाकी गाडी मालकाची गाडी सोबत असलेली भावनिक नातेदेखील गाड्यांना टिकवून धरण्यासाटी महत्त्वाचे कारण ठरत आहे. विशेषतः अधिक वयाची मंडळी नंतरच्या काळात गाड्यांचे नवीन मॉडेल स्वीकारत नाहीत व जुनी गाडी सोडत नाहीत. या भावनिक नात्यापोटी अनेकजण गाडी खराब झाली तरी तिची स्मृती रहावी, यासाठी गाडी घरातील गॅरेजमध्ये ठेवतात. काही जण गाडी घेतल्यानंतर शक्‍यतो विकू नये असा प्रयत्न करतात. वाढदिवशी घेतलेली गाडी, कुटुंबियांनी भेट दिलेली गाडी, अशा अनेक प्रसंगाशी जोडलेले हे नाते ग्राहक व त्यांची दुचाकी यांच्यामध्ये भावनिक नाते तयार होते. करिअर सुरू झाल्यानंतर घेतलेली पहिली गाडी हा ग्राहकाचा विक पॉंईट असतो. अनेक ग्राहक ही पहिली गाडी न विकता ती जशी आहे, तशी चालवण्याचा प्रयत्न करतात. गाडीच्या देखभालीच्या बाबत असलेल्या सर्व्हिसिंग हे ग्राहक घेतात. मात्र त्या बाबतच्या अनेक प्रकारच्या सेवा मिळत असल्या तरी त्या महागड्या ठरतात. 
स्वतःच्या दुचाकीशी भावनिक नाते असणाऱ्यांना भरपूर खर्च करून त्यांची दुचाकी नवी होती, तशी पुन्हा राखता येत नाही. तसेच या गाड्यांसाठी लागणाऱ्या सेवा देत असताना छोटे सर्व्हिसमन त्यांच्याकडे सर्व सेवा देण्यासाठी पुरेसे भांडवल नसल्याने ग्राहकांचे गाडीच्या नुतनीकरणाबाबत पूर्ण पर्याय देऊ शकत नाहीत. ज्या सर्व्हिस सेंटरवर हे पर्याय उपलब्ध आहेत, तेथे सर्व सेवांचा एकत्र खर्च खूपच महागडा ठरतो. दुचाकी विक्रेतेदेखील अशा प्रकारची सेवा देत असतात. 

आकडे बोलतात  
वाहन खरेदीनंतर पहिल्या पाच वर्षात भावनिक नाते जपणारे ग्राहक : 70 टक्के 
पुढील पाच वर्षात नाते जपण्यासाठी गाडी देखभाल करणारे ग्राहक : 50 टक्के 
भावनिक नाते असूनही देखभाल न झाल्याने असमाधानी असणारे ग्राहक : 90 टक्के 
रिस्टोअरेशनचा पर्याय न मिळाल्याने गाडीचे भावनिक नाते संपवणारे ग्राहक : 80 टक्के 

 सरप्राईज गिफ्ट
माझ्या वडिलांनी 2012 मध्ये ऍक्‍टिव्हा गाडी घेतली. गाडीची देखभाल होईना म्हणून मी वडिलांना गाडी विकावी का असे विचारले. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे गाडीच्या विक्रीस नकार दिला. त्यानंतर वडील विदेशात प्रवासासाठी गेले. तेव्हा मी गाडी रिस्टोरेशन करुन ठेवली. त्यांना आल्यावर त्यांच्या आवडत्या गाडीचे रुप पाहून सरप्राईज गिफ्ट दिले. 
-निकेत ढंगे, सोलापूर  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com