‘तो’, ‘ती’ आणि लॉकडाउन

Emphasis on video calls to express love in the midst of lockdown
Emphasis on video calls to express love in the midst of lockdown

सोलापूर : नेहमीच प्रेमाच्या अनेक जण खूप गप्पा मारतात. आईचं प्रेम, वडिलांचं प्रेम, भाऊ- बहीण यांच्यामधील प्रेम, एवढेच कशाला मित्रप्रेम, नातेवाईकांमधील प्रेम असे कितीतरी नातेसंबंध आहेत. जे प्रेमाच्या पायावर भक्कम उभे आहेत. त्यात महत्त्वाचं प्रेम म्हणले की, डोळ्यासमोर येथे एक लव्ह कपल्स यांचे प्रेम. परंतु सध्या कोरोनाव्हायरस मुळे सर्वत्र लॉकडाउन केले आहे. त्यामुळे सर्व काही बंद आहे. त्यामुळे ते तो आणि ती यांच्यात लॉकडाउनमुळे दुरावा निर्माण झाला आहे,
नेहमीच प्रेमीयुगुल प्रेम व्यक्त करण्यासाठी जागेच्या शोधात असतात. त्यात सध्या लॉक डाउनमुळे सर्व बंद आहे. त्यात महाविद्यालये बंद असल्यामुळे प्रेमीयुगुलांना घराच्या बाहेर पडता येत नाहीये. त्यांची दोघांची अनोखी ओढ, पार्टनरचाच ध्यास, प्रत्यक्ष भेट जरी नाही झाली ना तरी स्वप्नात आणि विचारांच्या मैफिलीत होणारी साखर भेट आणि पार्टनरच्या भेटीच्या गोडीची चव चाखत प्रत्यक्ष भेट होईल, याची मनाला काढलेली समज. या लॉकडाउनमुळे कदाचित त्यांना एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हवी तशी जागा मिळत नाही. प्रेमीयुगुल म्हणले तर खासकरून डोळ्यासमोर येतात ते महाविद्यालयीन कपल्स. लेक्चरच्या नावाने घराबाहेर पडणारे दोघेजण शांत जागी, गार्डन, कॅफे, रेस्टॉरंट, कपल पॉईंट आणि लॉंग ड्राईव्हवर फिरण्यासाठी जात असतात. परंतु लॉकडाउनमुळे प्रेमीयुगुलांचे हे सर्वत्र फिरणे बंद झाले आहे. हल्ली टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की कितीही लांब असले तरीदेखील एकमेकांना चेहरा पाहता येऊ शकतो, तो केवळ एका व्हिडिओ कॉलमुळे. पण घरात बसून फोनवर बोलावे म्हटले तरीही पूर्ण कुटुंब घरातच असल्यामुळे या प्रेमीयुगुलांना घरात मनमोकळेपणाने कॉल तसेच व्हिडिओ कॉल्सवरही बोलता येत नाहीये. एकूणच लॉक डाउनमुळे प्रेमी युगुल यांच्यातील असलेले संबंध दुरावत चाललेले दिसून येत आहे.
प्रेम माणसाला नवीन गोष्टी करायला भाग पाडतं प्रेमाच्या भावनेला अनेक पदर आहेत. या प्रेमाविषयी आपण कितीतरी बोलतो तर अगदी थोडे म्हणजे जेवणातल्या मिठाइतकंसुद्धा पण आवर्जून प्रेमाचा विषय निघतच असतो. कारण ते जास्त झालं तरी खाल्लं जात नाही आणि कमी झाली तरी पचत नाही आणि महत्त्वाचं आहे ते प्रमाणात असणार प्रेम म्हणजे डोळ्यासमोर येथे एक लव्ह कपल्स यांचे प्रेम.
प्रेमात पडणं म्हणजे दोन जीवाना लागलेली ओढ की पुन्हा पुन्हा भेटण्याची वेळ. प्रेम म्हणजे समजली तर भावना ठेवला तर विश्वास मांडला तर खेळ आणि निभावला तर जीवन. प्रेम मिळवण्यासाठी आणि ते प्रेम कायम टिकवण्यासाठी एकमेकांना दिले जाणारे गुलाब, चॉकलेट, ग्रीटिंग, विविध भेटवस्तू, मुव्ही, एकमेकांना केलेले छोटे-छोटे सरप्राईज प्लॅन आणि एकमेकांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली की एकमेकांना भेटणं हे सर्व नेहमीच त्या दोघांसाठी ओसंडून वाहत असतात. परंतु सध्या हे बंद झाले आहे. नातं दीर्घकाळ टिकविण्यासाठी अनेक प्रेमीयुगुल प्रयत्न करत असतात. फोन कॉल, व्हिडिओ चॅट,फेसबुक स्काईफ व्हिडिओ अशा कित्येक इंटरनेट टेक्नॉलॉजीमुळे पार्टनरसोबत कोणत्याही क्षणी वेळ देऊ शकतात. त्यामुळे लॉक डाउनमध्ये सध्या नात्यांमध्ये संवाद होणे अतिशय गरजेचे असते.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लॉक डाउनमधील प्रेम

प्रेम करणारे कपल कधीही कुठेही भेटण्यासाठी निमित्त शोधत असतात. मनात आलं की लेक्चर बुडवून रोज कुठे ना कुठे फिरत असतात. परंतु सध्या कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे त्यामुळे सर्व बंद आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयसुध्दा बंद असल्यामुळे सर्व प्रेमी युगुल घरातच बसून आहेत. यामुळे प्रेमीयुगुलांना घराच्या बाहेर पडणे हे आता अवघड झाले आहे. त्यात आता कसे बाहेर निघायचे आणि केव्हा भेटायचे...? काय करायचे...? असे आणखीन किती दिवस न भेटताच राहावे लागेल असे एक ना अनेक प्रश्न प्रेमी युगुल त्यांच्यासमोर उद्भवत आहे. 

सोशल मीडियावर प्रेमी युगुलांची स्थिती...
सध्या सोशल मीडियावर लॉकडाउनमध्ये प्रेमी युगुलांची काय स्थिती आहे. यावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत. त्या गाण्यांमध्ये 
- उडते पतंगो में...
- लंबी जुदाई...
- बेपनाह प्यार है आजा...
-  तुमसे मिलने को दिल करता है...
-  जिंदगी बेवफा है माना नहीं...
-  ये दुरीया...
-  हमारी दुरिया, सही जाये ना...
-  आजा तुझको पुकारे मेरे गीत रे...
-  मैं यहा तुम वहा...
- ओ अजनबी, मेरे अजनबी...
- अगर तुम साथ हो...
- जिस दिन तुझको ना देखू...
-  मेंरे पास तुम रहो, जाने की बात ना करो...
- हमारा हाल ना पुछो यह दुनिया भूल बैंठे है...
-  का रे दुरावा...
-  कितीदा नव्याने तुला आठवावे...
-  ओढ तुझी छळते मला...
- किती सांगायचंय तुला मला...
-  जिथे जिथे जाते तिथे तुझी आठवण...
-  लॉक डाउनच्या चक्करमध्ये ब्रेकअप पक्का...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com