#CoronaVirus गावात नव्याने आलेल्यांना घरात न घेता निवारा केंद्रात दाखल करा 

Enroll newcomers to the shelter center without taking them home
Enroll newcomers to the shelter center without taking them home
Updated on

अक्कलकोट (जि. सोलापूर) : मुंबई, पुण्यासह परजिल्हा व परराज्यातून नव्याने आलेल्या कुणालाही घरात किंवा गावात न घेता प्रशासनाने व्यवस्था केलेल्या निवारा केंद्रात दाखल करावे व प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कडक कारवाई करू, असा इशारा अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड यांनी पत्रकार परिषदेत दिला. 


अक्कलकोट तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तहसीलदार मरोड यांच्यासह आमदार सचिन कल्याणशेट्टी हेही उपस्थित होते. दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. तहसीलदार मरोड यांनी सांगितले, पुणे, मुंबईसह परराज्यातून आतापर्यंत तालुक्‍यात 17 हजार 853 नागरिक आले असल्याची माहिती देऊन त्यापैकी बहुतांश जणांचा 14 दिवसांचा कालावधी संपलेला आहे. परजिल्हा व परराज्यातून आता नव्याने तालुक्‍यात येणाऱ्या नागरिकांना ठेवण्यासाठी तीन निवारा कक्ष शहरात उघडण्यात आलेले आहेत याची क्षमता 191 लोकांची आहे. सध्या नव्याने आलेले 56 लोक असून त्यांना निवारा कक्षात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे चार हजार लोकांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारले होते. त्यापैकी केवळ नऊ जण संशयीत राहिलेले आहेत. सध्या अंतरराज्य, आंतरजिल्हा व तालुक्‍याच्या काही ठिकाणी जोडणाऱ्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच मालवाहतूक करणारे तालुक्‍यातील चालक हे घरी न जाता जिल्हा परिषद शाळेच्या निवारा केंद्रामध्ये राहण्याची त्यांची व्यवस्था केल्याचे तहसीलदार मरोड यांनी सांगितले. एप्रिल महिन्याचे रेशन धान्यचे वाटप पूर्ण झालेले असून पंधरा दिवसानंतर केसरी कार्ड धारकांना मे व जूनचे धान्य वाटप करण्यात येणार असल्याचे सांगून शहरात दोन ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Teachers Constituency
Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Marathi News Esakal
www.esakal.com