महापालिकेतर्फे 1 ते 10 ऑक्‍टोबरदरम्यान निबंध स्पर्धा ! कोरोनावरील उपाययोजना अन्‌ जनजागृतीसाठी उपक्रम

तात्या लांडगे
Sunday, 27 September 2020

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव तथा संसर्ग कमी करण्याच्या हेतूने राज्य सरकारच्या सूचनेनुसार 'कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांतर्फे राबविली जात आहे. घरोघरी जाऊन शिक्षकांच्या माध्यमातून त्याचा सर्व्हेही सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, त्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांचाही सहभाग घेतला जाणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेने 1 ते 10 ऑक्‍टोबर या काळात निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.

कोविड आणि माझे कुटूंब, कोविडपासून सुरक्षितता आणि माझी जबाबदारी, कोरोना संकटापासून बचावाच्या उपाययोजनांसाठी बचावाच्या उपाययोजनांसाठी अभिनव उपक्रम तथा संकल्पना आणि कोविड व इतर आजारांत घ्यावयाची काळजी (मधूमेह, ह्दविकार, किडनी विकार) या विषयांवर अनुक्रमे चौथी ते आठवी, नववी ते बारावी आणि पालक व सामान्य नागरिकांसाठी ही स्पर्धा असणार आहे. तर इयत्ता चौथी ते आठवी, नववी ते बारावी व पालकांसाठी चित्रासह पोस्टरचीही स्पर्धा होणार आहे. शहरातील सर्वांसाठी शॉर्ट फिल्मचीही स्पर्धा आयोजित केल्याचे महापालिकेचे उपायुक्‍त धनराज पांडे यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी पाच हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक तर द्वितीय बक्षिस तीन हजार, तृतीय बक्षिस दोन हजार रुपये असणार आहे. अधिक माहितीसाठी 9689998690 या क्रमाकांवर संपर्क करावा, असेही श्री. पांडे यांनी सांगितले.

ठळक बाबी...

  • इयत्ता चौथी ते बारावीचे विद्यार्थी, पालक, सर्वसामान्य नागरिकांना घेता येईल स्पर्धेत सहभाग
  • कोरोनापासून सुरक्षितता आणि माझी जबाबदारी, कोविड आणि माझे कुटूंब, कोरोनापासून बचावासाठी उपायोजना, कोरोनासह अन्य आजारपणात घ्यावयाची काळजी असे असणार निबंधाचे विषय
  • चित्रासह पोस्टर स्पर्धांचेही आयोजन; चौथी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, पालकांसह सर्वसामान्यांनाही घेता येणार सहभाग
  • खुल्या गटासाठी शॉर्ट फिल्म स्पर्धा; 1 ते 10 ऑक्‍टोबरपर्यंत पार पडणार संपूर्ण स्पर्धा
  • http://forms.gle.F4345yGMVSHGKRDw9 यावर नोंदविता येईल नाव
  • पहिले बक्षिस पाच हजार, द्वितीय बक्षिस तीन हजार तर तृतीय बक्षिस दोन हजारांचे असणार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Essay competition by Municipal Corporation from 1st to 10th October; Corona measures and public awareness activities