कौटगीमठ कुटुंबाची परंपरा
तोळणूरच्या कौटगीमठ कुटुंबातील व मंगरुळे प्रशालेतील शिक्षक डी. जी. कौटगीमठ यांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर 24 सेट परीक्षा, तीन नेट परीक्षा, टीईटीसह 11 वर्ल्ड रेकॉर्ड करुन लिमका बुकमध्ये आपली कामगिरी नोंदविली. त्यानंतर मल्लिनाथ कौटगीमठ यांच्या मुलांनीही विक्रम केला. त्यांच्या कुटुंबात डॉक्टर, पोलिस, शिक्षक, एसटी ड्रायव्हर, डी. फार्मसी ऑफिसर, मार्केटिंग मॅनेंजर या पदावर कार्य करत असलेली पिढी निर्माण झाली आहे.
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर हे कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचं गाव. मराठी-कानडी अशा दोन्ही संस्कृतीचा मिलाफ. कन्नडचा प्रभाव अधिक असला तरी शिक्षणावर भर देणारं गाव. याच गावातील मल्लिनाथ कौटगीमठ यांनी साखर कारखान्यात कामगार म्हणून अल्प पगारात काम करत आपल्या तिन्ही मुलांना इंजिनिअर बनवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आधीच हलाखिची परिस्थिती. त्यात शिक्षणही अल्प. दहावीनंतर आयटीआय प्रशिक्षण घेतलेले मल्लिनाथ यांनी सुरवातीच्या काळात मिळेल तेथे काम केले. त्यानंतर त्यांना कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात नोकरीच्या रुपात आधार मिळाला. कधी हेल्पर, तर कामगार, तर कधी कधी सुट्टीही. या सगळ्या बाबीचा विचार न करता कर्मालाच पूजा समजून ते कार्य करत राहिले. फक्त निर्धार होता, आपल्या मुलांना उच्च विद्याविभूषित करायचा. जगण्याचा संघर्ष सुरु होताच. अशात 2016 साली त्यांची अर्धांगिनी ललिता कौटगीमठ यांचे निधन झाले. यामुळे त्यांच्यावर दु:खाचे डोंगर कोसळले. एकीकडे मुलांचे शिक्षण, दुसरीकडे पत्नीच्या निधनाचे दु:ख. तिसरी बाब म्हणजे नोकरी करणे. सगळ्या आघाड्यांवर काम करीत त्यांनी मुलांना शिक्षणापासून परावृत्त होऊ दिले नाही. मुलेही मोठी जिद्धी निघाली. मोठा मुलगा उमेशने सोलापुरातच शिक्षण घेत मेकॅनिकल, तर दुसरा मुलगा उमेश इलेक्ट्रिकल, तर मुलगी पल्लवी हिनेदेखील मीही काही कमी नाही म्हणत कॉम्प्युटर इंजिनिअर होऊन वडिलांच्या संघर्षाला सलाम केला. यामुळे जीवनाचे सार्थक झाल्याचे मल्लिनाथ कौटगी सांगतात.
कौटगीमठ कुटुंबाची परंपरा
तोळणूरच्या कौटगीमठ कुटुंबातील व मंगरुळे प्रशालेतील शिक्षक डी. जी. कौटगीमठ यांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर 24 सेट परीक्षा, तीन नेट परीक्षा, टीईटीसह 11 वर्ल्ड रेकॉर्ड करुन लिमका बुकमध्ये आपली कामगिरी नोंदविली. त्यानंतर मल्लिनाथ कौटगीमठ यांच्या मुलांनीही विक्रम केला. त्यांच्या कुटुंबात डॉक्टर, पोलिस, शिक्षक, एसटी ड्रायव्हर, डी. फार्मसी ऑफिसर, मार्केटिंग मॅनेंजर या पदावर कार्य करत असलेली पिढी निर्माण झाली आहे.
कामगारांचे जगणे वाट्याला येऊ नये
अनेक हालअपेष्टा सहन करत मुलांना शिकविले. बॅंकांनी कित्येकवेळा कर्ज देण्यास नाकार दिला. तरीही जिद्द न सोडता माझ्याप्रमाणे मुलांच्या वाट्याला कामगारांचे जीणे येऊ नये, म्हणून हा प्रयत्न केला. आज मुले इंजिनिअर झाल्याने कष्टाचे चिझ झाल्याचे समाधान वाटत आहे. कोणाच्या जीवनात कामगारांचे जगणे येऊ नये, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा.
-मल्लिनाथ कौटगीमठ, पालक, तोळणूर
संपादन : अरविंद मोटे