वटवृक्ष मंदिरातील गुरुप्रतिपदेवरही कोरोनाची वक्रदृष्टी ! पालखी सोहळ्यासह धार्मिक कार्यक्रम रद्द

Swami Samarth
Swami Samarth
Updated on

अक्कलकोट (सोलापूर) : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने रविवारी (28 फेब्रवारी) माघ वद्य प्रतिपदा (गुरुप्रतिपदा) उत्सव वटवृक्ष मंदिरात साजरा होत आहे. सकाळी 8.30 वाजता ज्योतिबा मंडपात देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते पुरोहित मंदार महाराज व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत लघुरुद्र अभिषेक व सकाळी 11.30 वाजता नैवेद्य, आरती संपन्न होईल. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अक्कलकोट शहरातून भजन, दिंड्यांसह सवाद्य निघणारा पालखी सोहळा व गुरुप्रतिपदेनिमित्त आयोजित करण्यात येणारे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याप्रसंगी बाहेरील भाविकांचा सहभाग असणार नाही. 

सालाबादप्रमाणे सायंकाळी पाच ते रात्री 9.30 या वेळेत अक्कलकोट शहरातून भजन, दिंड्यांसह सवाद्य निघणारा पालखी सोहळा व गुरुप्रतिपदेनिमित्त आयोजित करण्यात येणारे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंदिरातील महाराजांची नित्यपूजा, आरती वगळता सर्व धार्मिक कार्यक्रम व भाविकांच्या वतीने होणारे पूजा विधी अजूनही बंदच आहेत. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून मंदिरात तसेच अक्कलकोट शहर व परिसरात कोरोना संसर्ग बळावू नये याकरिता मंदिर समितीच्या वतीने सर्व प्रकारच्या शासकीय नियमांचे पालन करण्यात येत आहे. 

येणाऱ्या भाविकांना मंदिर व परिसरात सॅनिटाझजरची सोय करण्यात आली असून, मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनाउन्समेंटद्वारे व देवस्थानच्या वतीने नित्यपणे व सातत्याने तशा सूचना भाविकांना करण्यात येत आहेत. भाविकही या नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसून येत आहे. तरी "श्रीं'च्या दर्शनाकरिता भाविकांनी मंदिरात आल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात न येता मास्क व सॅनिटायझरचा वापर करून ठराविक अंतराने स्वामींचे दर्शन घेऊन सुरक्षितपणे माघारी जावे, असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com