पंढपुरातील प्रत्येक कुटुंबाला मोफत गणेश मूर्ती भेट...मनसेच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद 

भारत नागणे
Sunday, 16 August 2020

यंदाच्या गणेश उत्सवावर कोरोना महामारीचे मोठ संकट आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात देखील कोरोनाचे थैमान सुरू आहे. ऐन गणपती सणात गर्दीमुळे आणखी कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सामाजिक भावनाने मनसेच्या वतीने शहरातील नागरिकांना घरपोच ते ही मोफत गणेश मूर्ती दिले जाणार आहे.

पंढरपूर (सोलापूर) :  यंदाच्या वर्षी मनसेच्या वतीने पंढरपुरातील प्रत्येक कुटुंबाला मोफत गणेश मूर्ती भेट देण्यात येणार आहे. शहरातील सुमारे 16 हजार  कुटुंबाना गणेश मूर्ती देण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत जवळपास साडेसात हजार कुटुंबांनी गणेश मूर्तीची मागणी केली आहे. मनसेच्या या नव्या उपक्रमाला पंढरपूरकारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली.

यंदाच्या गणेश उत्सवावर कोरोना महामारीचे मोठ संकट आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात देखील कोरोनाचे थैमान सुरू आहे. ऐन गणपती सणात गर्दीमुळे आणखी कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सामाजिक भावनाने मनसेच्या वतीने शहरातील नागरिकांना घरपोच ते ही मोफत गणेश मूर्ती दिले जाणार आहे.

पंढरपूर शहरात घरोघरी गणपती उत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थीपूर्वी दोन दिवस बाजारात गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा अधिक धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी मनसेच्या वतीने मोफत आणि घरपोच गणशे मूर्ती देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील 16 शहर कुटूंबाना गणेश मूर्ती भेट देण्याचा संकल्प केला आहे.

गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी मनसेचे कार्यकर्ते मागणी केलेल्या प्रत्येक गणेश भक्ताच्या घरी जाऊन गणेश मूर्ती देणार आहेत. आता पर्यंत सात हजार कुटुंबांनी मनसेकडे गणेश मूर्तीसाठी मागणी केली आहे. पंढरपूर शहरातील कारागिरांनी तयार केलेल्या सुमारे पाच हजार गणेश मूर्ती खरेदी केल्या आहेत. दोन हजार मूर्ती सोलापुरातून मागवण्यात आल्या आहेत.

पंढरपूर शहरातील गणेश भक्तांनी मूर्ती खरेदीसाठी बाजारात गर्दी न करता मनसेच्या इंदिरा गांधी चौकातील कार्यालयात नाव नोंदणी केल्यास कार्यकर्ते घरपोच गणेश मूर्ती पोहच करतील. भेट देण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती या शाडू मातीपासून आणि नैसर्गिक रंगसंगतीचा वापर करून तयार केलेल्या आहेत. त्यामुळे यंदाचा गणेश उत्सव पर्यावरण पूरक पध्दतीने साजरा करता येणार आहे. मनसेच्या या पर्यावरण गणेशोत्सव उपक्रमात शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Every family in Pandhapur will be given a free Ganesh idol by MNS