चार गावांतील विद्यार्थी व पालकांना सूर्यग्रहण दाखवण्याचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा लक्षात घेऊन इनोव्हेटिव्ह स्कूलचे शिक्षक असे परिघाबाहेरचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत.

पेनूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) ः अंकोली येथील इनोव्हेटिव्ह स्कूलने खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशेष फिल्टरचा उपयोग करून विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण अभ्यासण्याची संधी मिळवून दिली.

या शाळेतील शिक्षकांनी स्वतः सूर्यकिरण फिल्टर तयार केले. यासाठी वैज्ञानिक अरुण देशपांडे यांनी फिल्टर पेपर पुरविला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तसेच मास्क, सॅनिटायझर व थर्मल स्कॅनर वापरून अंकोली परिसरातील चार गावे व विविध वस्त्यांवर प्रत्यक्ष जाऊन सूर्यग्रहण दाखविले. सूर्यग्रहण कसे होते याचीही माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दाखविली. 192 मुले व 123 पालक ग्रामस्थांनी इनोव्हेटिव्ह स्कूल, अंकोलीच्या या उपक्रमाचा लाभ घेतला.

ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा लक्षात घेऊन इनोव्हेटिव्ह स्कूलचे शिक्षक असे परिघाबाहेरचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. वैज्ञानिक अरुण देशपांडे व शेजबाभूळगाव शाळेचे शिक्षक पैगंबर तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक रियाज तांबोळी, शिक्षक सागर येळवे, सुजाता गोडसे, किरण भंडारे, ज्योती राऊत यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष अजीज तांबोळी, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्‍वर निंबर्गी, राजाभाऊ भंडारे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experiment of showing solar eclipse to students and parents in four villages