कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजाची वाढविली वेळ ! सोमवारपासून 'या' वेळेत चालणार कामकाज 

तात्या लांडगे
Saturday, 31 October 2020

जिल्हा न्यायालयाच्या कामाकाजात बदल नाही 
कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजाची वेळ वाढविण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयाचे कामकाज सध्या सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत पार पाडले जात आहे. त्यामध्ये रिमांड, जामीन अर्ज व अतितातडीचे व अतिमहत्त्वाच्या दाव्यांवर सुनावणी घेतली जात आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

सोलापूर : कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजाची वेळ 2 नोव्हेंबरपासून वाढविण्यात आले आहे. नव्या बदलानुसार न्यायालयाचे कामकाज आता सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळेत चालणार आहे. सध्या कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज एकाच शिफ्टमध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत होत होते.

 

जिल्हा न्यायालयाच्या कामाकाजात बदल नाही 
कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजाची वेळ वाढविण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयाचे कामकाज सध्या सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत पार पाडले जात आहे. त्यामध्ये रिमांड, जामीन अर्ज व अतितातडीचे व अतिमहत्त्वाच्या दाव्यांवर सुनावणी घेतली जात आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजाला आणखी चालना मिळणार आहे. ज्या पक्षकारांची आणि वकिलांची कोर्टात दाव्यांसंदर्भात सुनावणी आहे, त्यांनाच न्यायालयात सुनावणीवेळी प्रत्यक्ष हजर राहण्यास परवानगी असणार आहे. तत्पूर्वी, कोरोनामुळे न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी वेळ कमी पडत असल्याने कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. सध्या केवळ तातडीच्या दाव्यांसाठीच कोर्टाचे कामकाज सुरू आहे. कौटुंबिक न्यायालयात मुलांची कस्टडी, पोटगीचे दावे, परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याच्या दाव्यांवर प्रामुख्याने सुनावणी सुरू होती. मात्र, पूर्वीचा वेळ कमी पडत असल्याने कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजाची वेळ वाढवून देण्याचा निर्णय झाला. कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ऍड. नितीन स्वामी व खजिनदार ऍड. संदेश कुलकर्णी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारपासून (ता. 2) कौटुंबिक न्यायालयात साक्ष पुरावा नोंदविण्याचे काम पुन्हा सुरू होणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीचे सर्व उपाय व खबरदारी घेऊन न्यायालयीन कामकाजात वकील व पक्षकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extended working hours of family court! The work will be continue held from 10.30 am to 4 pm