धोका पत्करून वाचवला तरुणांचा डोळा

994.jpg
994.jpg

टेंभुर्णी (सोलापूर) : खेळताना डाव्या डोळ्यास मार लागून आतून सूज आल्याने मोतीबिंदू व नंतर त्याचे रूपांतर काचबिंदूत झाले. लॉकडाउन काळात टेंभुर्णी येथील ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ डॉ. आनंद खडके यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना धोका पत्करून दृष्टी गेलेल्या युवकावर तातडीची यशस्वी शस्त्रक्रिया करून डोळा वाचविला. 

गोरडवाडी (ता. माळशिरस) येथील 17 वर्षीय प्रसाद धुळदेव कर्णावर या युवकास खेळताना डाव्या डोळ्यास मार लागून आतून सूज आली होती. डोळ्यावरील दाब वाढून त्यास मोतीबिंदू व काचबिंदू झाला. यामुळे त्याची दृष्टी अत्यंत कमी झाली होती. तो आशानंद नेत्र हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ डॉ. आनंद खडके यांच्याकडे तपासणी करण्यासाठी आला होता. डॉ. खडके यांना तपासणी अंती युवकास मोतीबिंदू, काचबिंदू झाल्याचे व तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. डॉ. खडके यांनी त्या युवकाच्या शैक्षणिक, व्यावसायिक करिअरचा विचार करून कोरोनाविषयी आवश्‍यक ती काळजी घेत शस्त्रक्रिया करून लेन्स टाकल्याने प्रसादला पूर्वीसारखी दृष्टी मिळाली. शस्त्रक्रियेनंतर सूज येऊ नये याची काळजी घेत आहेत. 

हेही वाचाः कोरोना संकटात त्यांची पाण्यासाठी भटकंती 
डॉ. आनंद खडके यांनी रुग्णांच्या सेवेसाठी ओपीडी, इमर्जन्सी सेवा सुरू ठेवली आहे. डोळ्याच्या रुग्णावर एक फूट अंतरावरून उपचार करावे लागतात. यामुळे रुग्णसेवेसाठी खूप रिस्क घेऊन काम करावे लागते. यावेळी आपण स्वतः मास्क वापरतो, त्याचबरोबर रुग्णांना मास्क लावणे बंधनकारक केले आहे. दवाखान्यात सॅनिटायझर्स सुविधा उपलब्ध आहे. एक फुटावरून रुग्णसेवा देताना एखादा रुग्ण शिंकला वा खोकला तर कोरोनाचा संसर्ग झाल्यास धोका वाढतो. यामुळे पुरेशी काळजी घेऊनच उपचार, शस्त्रक्रिया करावी लागते. मोतीबिंदूतून काच बिंदू झालेल्या रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करताना कोरोनाविषयी सर्व नियम, अटी पाळून खबरदारी घेऊनच उपचार केले जातात, असे डॉ. खडके यांनी सांगितले. 

काळजीपुर्वक केली शस्त्रक्रीया 
कोरोना संकटामध्ये अत्यंत महत्वाच्या शस्त्रक्रीया करताना आवश्‍यक ती संपुर्ण काळजी घेतली जात आहे. तातडीच्या शस्त्रक्रीया अधिक सुरक्षीतपणे करणे आवश्‍यक झाले आहे. 
-डॉ. आनंद खडके, नेत्रतज्ज्ञ 
आशानंद नेत्र रुग्णालय, टेंभुर्णी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com