कोरोना : सुट्ट्यांमुळे आनंद झाला द्विगुणित

सुस्मिता वडतिले
Friday, 27 March 2020

रोजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरदार वर्गाना कुटुंबाला वेळ देणे जमत नाही. मात्र कोरोना व्हायरसमुळे सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे दुरावलेली कुटुंब एकत्र आली आहे. कुटुंब एकत्र आल्यामुळे सर्वजण एकमेकांना वेळ देत आहे. घरात मनोरंजन खेळ, वेगवेगळे प्रयोग, आवडता छंद, घरगुती उन्हाळी कामे असे अनेक आवडीचे काम करून छंद जोपासत आहेत.

सोलापूर : कोरोनामुळे अनेक दुरावलेली कुटुंब एकत्र आली आहेत. त्यामुळे दिवसभर कुटुंबासोबत वेळ घालवता येत असल्याने घरगुती आणि नोकरदार काम करणाऱ्या महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरदार वर्गाना कुटुंबाला वेळ देणे जमत नाही. मात्र कोरोना व्हायरसमुळे सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे दुरावलेली कुटुंब एकत्र आली आहे. कुटुंब एकत्र आल्यामुळे सर्वजण एकमेकांना वेळ देत आहे. घरात मनोरंजन खेळ, वेगवेगळे प्रयोग, आवडता छंद, घरगुती उन्हाळी कामे असे अनेक आवडीचे काम करून छंद जोपासत आहेत. कुटुंबासोबत मस्ती करण्यात वेळ घालवत आहेत. कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्वांना सुट्टी देण्यात आली असून अनेकजण त्या वेळेचा सदुपयोग करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गृहिणी म्हटलं की घरकाम आल. घरातील काम करून कंटाळा हा जाणवतो. काहीवेळा सुट्टी असावी अस ही वाटत. कोरोनोचा प्रादुर्भाव त्यामुळे मिळालेली सुट्टी याचा सदुपयोग अनेकजण करत आहेत. सुट्टीमुळे सर्व घरात असल्यामुळे घरातील कामात मदत मिळत आहे. 

छंद पूर्ण करण्यासाठी वेळ
सर्व कामे लवकर पूर्ण होत असल्यामुळे खूप वेळ शिल्लक राहत आहे.  त्याचा सदुपयोग करण्याचं ठरवलं. सुट्टीचा वापर आवडीचे छंद पूर्ण करण्यात होत आहे. त्यामुळे मन अगदी प्रसन्न होते. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी पुष्कळ गोष्टी आपण करू शकतो.
- सुप्रिया सुरवसे, गृहिणी

घरी आराम वाटतो
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःला वेळ देणे जमत नाही. घरचे काम आणि ऑफिस मधील काम यातचं दिवस जातो. त्यामुळे स्वतःला वेळ देणे होत नाही. परंतु सध्या कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्याने सर्वाना सुट्टी दिली असल्यामुळे घरी आराम वाटत आहे. 
- ज्योती मोरे, नोकरदार महिला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The family together because of Coronas holidays