भाडेपट्ट्याने दिलेली जमीन परत मिळत नसल्याने विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या ! चिठ्ठीमुळे तिघांवर गुन्हा दाखल

Mulani
Mulani
Updated on

करमाळा (सोलापूर) : भिवरवाडी (ता. करमाळा) येथील 25 वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर दिलेली शेतजमीन करार संपूनही परत मिळत नसल्याने मुबारक मेहबूब मुलाणी या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. 

मुबारक मुलाणी यांनी सोमवारी (ता. 25) विषारी प्राशन केले तर बुधवारी (ता. 27) रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर करमाळा पोलिसात मृत्यूस जबाबदार तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्याने विषारी औषध घेण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. यावरून मल्हारी आरकिले, नारायण आरकिले व दत्तात्रय आरकिले (सर्व रा. भिवरवाडी, ता. करमाळा) अशा तिघा संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मृताचा मुलगा शब्बीर मुबारक मुलाणी यांनी फिर्याद दिली आहे. 

25 जानेवारी रोजी शेतकरी मुबारक यांनी मुलगा शब्बीर यास फोन करून सांगितले की मल्हारी, दत्तात्रय व नारायण आरकिले हे शेतात जाण्यापासून मला अडवत आहेत. त्यामुळे शेतातील केळीचे नुकसान होत आहे. आता मला जीवन जगू वाटत नाही. त्यामुळे फवारणीचे विषारी औषध पिऊन झोपेच्या दहा ते बारा गोळ्या खाल्ल्या आहेत, असे कळवले व औषध पिऊन घरातच बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यामुळे शब्बीरने ही माहिती भावाला दिली व तिथे पाठवले. नंतर शेतकरी मुलाणी यांना सुरवातीला करमाळ्याच्या दवाखान्यात आणून नंतर सोलापूरला नेण्यात आले. तिथे दोन दिवस उपचार झाल्यानंतर उपचारादरम्यान बुधवारी (ता. 27) रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या वेळी मृत शेतकरी मुलाणी यांच्याकडे एक चिठ्ठीही मिळून आली. त्या चिठ्ठीवरून संशयित तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्या चिठ्ठीत मुलाणी यांनी लिहिलेला मजकूर... 
भिवरवाडी (ता. करमाळा) येथील सर्व्हे नंबर 436 येथील आठ एकरापैकी चार एकर शेतजमीन भाडेपट्टीवर देण्यासाठी जबरदस्ती केली. सह्या न केल्यास तुला रान करून देणार नाही, तर तू चार एकर कर, आम्हाला चार एकर दे, असे लिहून घेतले. नंतर पाच - दहा हजाराने 59 हजार रुपये दिले. याबाबतचे हस्तलिखित स्वतः दत्तात्रय आरकिले याने स्वतःजवळ ठेवले असल्याचेही त्यात नमूद केले आहे. तर चार एकर मी स्वतः वहिवाटत होतो. त्यावर बॅंक लोनवर नोंदही आहे. या प्रकरणात कोर्टाचीही त्यांनी दिशाभूल करून निकाल लावून घेतले असल्याचे पत्रात उल्लेख केला आहे. तर मृत्यूस जबाबदार म्हणून मल्हारी, नारायण व दत्तात्रय आरकिले हे जबाबदार आहेत, अशी नोंद या पत्रात केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com