म्हशींच्या गोठ्याला बंगल्याचे रूप!

Farmers built house for their animals
Farmers built house for their animals
Updated on

सोलापूर : तळेहिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) येथील किसन पाटोळे यांनी म्हशींसाठी अत्याधुनिक गोठा केला आहे. घराच्या बाजूला गोठ्यात म्हशींसाठी पंखे, चाऱ्याकरिता गव्हाण आणि पाण्याचा निचरा होऊन कायम स्वच्छता असेल अशी व्यवस्था त्यांनी केली. प्रथमदर्शनी हा गोठा नसून बंगला असल्याचा भास होतो. परिसरातून अनेकजण गोठा पाहण्यास येत असल्याचे त्यांनी सांगितले. 
सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या तळेहिप्परगा येथे पाटोळे यांच्याकडे 20 म्हशी आहेत. त्यांचा वडिलोपार्जित दुधाचा व्यवसाय असून ग्राहकांना चांगले दूध मिळण्याकरिता ते नेहमी प्रयत्नात असतात. म्हशींच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांनी गोठा केला असून यामुळे दूध जास्त आणि चांगले मिळते हे त्यांनी ओळखले. बंगल्याप्रमाणे त्यांनी गोठ्याला गेट केले असून तेथूनच ते घरात जातात. एका बाजूला 10 प्रमाणे दोन्हीकडे 20 म्हशी बांधण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी चारा व्यवस्थित खावा याकरिता योग्य उंचीची गव्हाण बांधली असून गोठ्याचे छत योग्य उंचीचे आहे. ऊन आणि डासांपासून बचाव होण्याकरिता पंखे आहेत. अनेकदा पाण्याचा निचरा झाला नाही तर दुर्गंधी पसरते. त्यामुळे म्हशी धुतल्यानंतर पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल अशी व्यवस्था केली आहे. श्री. पाटोळे हे सकाळी 7 वाजल्यापासून म्हशीच्या गोठ्यातील झाडलोट, दूध काढणे, त्यांना चारा टाकणे अशी कामे करतात. पुन्हा उन्हाच्या आधी म्हशींना फिरवून आणतात. 
 
अशी आहेत म्हशींची नावे 
पाटोळे यांच्याकडे 20 म्हशी असून त्यांची नावे गमतीशीर आहेत. म्हशीला नावाने हाक दिल्यास ती त्यांचेकडे पाहते. काजल, रूपा, सनी, सैनाद, हुशार, दिमाख, पोलाद, हौस, दुनिया अशी त्यांची नावे आहेत. 

म्हशींचे आरोग्य चांगले असावे याकरिता गोठा केला आहे. माणसांना स्वच्छता आवडते, मग त्यांना का नको? त्यांच्यासाठी स्वच्छ जागा असावी याची काळजी घेत आहे. जनावरांना डास चावून रोगराई, तसेच उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता आम्ही माणसांप्रमाणे जनावरांची काळजी घेतो. 
- किसन पाटोळे, तळेहिप्परगा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

One-Sided Obsession Ends in Murder; Family Loses Its Sole Breadwinner
Solapur
Dr. Shirish Valsangkar family's
NEET Exam
Marathi News Esakal
www.esakal.com