Video : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा; शनिवारी ‘या’ भागात जोरदार पाऊस

Farmers in Solapur district have been relieved by the rains
Farmers in Solapur district have been relieved by the rains
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात शनिवारी (ता. १३) दुपारी ३ वाजता जोरदार पाऊस झाला. या पावसाने बळीराजा सुखावला आहे. या पावसाळ्यातील हा पहिलाच मोठा पाऊस असल्याने शेतकरी पेरणी करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 
सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात काही ठिकाणी पाऊस पडला होता. त्यानंतर जूनमध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस पडला होता. त्यानंतर करमाळा तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र शनिवारी दमदार पाऊस झाल्याने खरीपाची पेरणी होईल असं शेतकरी सांगत आहेत. शनिवारी ३ वाजता करमाळा तालुक्यातील बिटरगाव (श्री), आळजापूर, बाळेवाडी परिसरात पावसाला सुरुवात झाली. ४ वाजपर्यंत पाऊस सुरु होता. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे ग्रामीण भागात भितीचे वातावरण आहे. अशा स्थितीत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मे व जूनमध्ये काही प्रमाणात

झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी मशागती करुन ठेवल्या होत्या. त्यामुळे शनिवारी झालेल्या पावसाने शेतकरी पेरणी करतील. काही शेतकऱ्यांनी मशागती झाल्याबरोबर पेरणीसाठी बी बीयाणे व खत आणले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com