
केत्तूर (सोलापूर) : इंधनाचे दर भरमसाठ वाढल्याने शेतीच्या मशागतीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ झाली असतानाच, पीव्हीसी पाइप तसेच खत उत्पादन कंपन्यांनी देखील खतांच्या दरात जवळजवळ 18 टक्के एवढी मोठी वाढ केली आहे. शेतमजुरीचे दरही वाढत आहेत. त्यातच वीज वितरण कंपनीने थकबाकीच्या कारणामुळे शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित केला असल्याने शेती व्यवसाय वरचेवर आतबट्ट्याचा खेळ ठरत आहे.
शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शेती करणे म्हणजे "आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपय्या' अशीच परिस्थिती झाली आहे. खत कंपन्यांनी दरवाढ करताना अमोनियाचे दर वाढल्याने खताच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने दरवाढ करीत असल्याचे सांगितले आहे.
खतांचे दर पुढीलप्रमाणे (सध्याचे दर व कंसात पूर्वीचे दर)
शेतीच्या खर्चात वरचेवर वाढत होत आहे. त्यातच नैसर्गिक संकटेही पाठ सोडायला तयार नसल्याने शेती करणे सध्याच्या काळात अवघड झाले आहे.
- ऍड. नीलेश वाघमोडे,
शेतकरी, वाशिंबे
शेतीच्या उत्पन्नातून सध्या कुटुंब चालवणे अवघड होत आहे. त्यातच वाढत्या खर्चाने त्यामध्ये तेल ओतण्याचे काम केले आहे.
- आबासाहेब ठोंबरे,
शेतकरी, केत्तूर
शेती पिकाचे उत्पन्न मिळवण्यासाठी खताशिवाय पर्याय नसल्याने खत टाकणे गरजेचे आहे. त्यातच खताच्या किमती भरमसाठ वाढल्याने खत टाकणे परवडत नाही.
- संतोष इंगळे,
शेतकरी, मांजरगाव
खताशिवाय उत्पन्नात वाढ होत नसल्याने खतांच्या किमती वाढल्या असल्या तरी खते नाइलाजाने घ्यावीच लागत आहेत. परंतु हळूहळू रासायनिक खत वापरण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.
- शहाजी पाटील,
शेतकरी, केत्तूर
थकीत वीज बिलासाठी शेतीपंपाचा बंद केलेला वीज पुरवठा तसेच वाढलेल्या खतांच्या किमती यामुळे ग्राहकच खतांसाठी दुकानात फिरकत नसल्याने खत व्यवसायाला मोठ्या अडचणी आल्या आहेत.
- राजेंद्र दोभडा,
खत विक्रेते, केत्तूर
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.