यापुढे मुस्लिम समाजाशिवाय कोणालाही सत्तेवर येता येणार नाही : फारूक शाब्दी 

राजशेखर चौधरी 
Friday, 1 January 2021

फारूक शाब्दी म्हणाले, आगामी सर्व नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसह इतर सर्व निवडणुकांत एमआयएम पक्ष भाग घेईल. आजपर्यंत मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतदानापुरता करण्यात आला आहे. यापुढे मुस्लिम समाजाशिवाय कोणालाही सत्तेवर येता येणार नाही, अशी ताकद निर्माण करणार आहोत व प्रत्येक घरा घरापर्यंत जाऊन पक्षाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या हितासाठी, कल्याणासाठी केलेल्या चांगल्या कामाची आठवण जनतेला करून देणार आहोत. 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील आगामी सर्व निवडणुकांत एमआयएम पक्ष सर्व तयारीनिशी आपली ताकद दाखवेल. यापुढे मुस्लिम समाजाशिवाय कोणालाही सत्तेवर येता येणार नाही, असा दावा पक्षाचे सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांनी केला. 

अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात सोलापूर एमआयएम पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम पक्ष मजबूत करण्यासाठी अक्कलकोट शहर आणि तालुकास्तरीय मेळावा व नूतन कार्यकारिणी निवड प्रक्रिया पार पडली. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी बोलत होते. 

पुढे बोलताना शाब्दी म्हणाले, आगामी सर्व नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसह इतर सर्व निवडणुकांत एमआयएम पक्ष भाग घेईल. आजपर्यंत मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतदानापुरता करण्यात आला आहे. यापुढे मुस्लिम समाजाशिवाय कोणालाही सत्तेवर येता येणार नाही, अशी ताकद निर्माण करणार आहोत व प्रत्येक घरा घरापर्यंत जाऊन पक्षाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या हितासाठी, कल्याणासाठी केलेल्या चांगल्या कामाची आठवण जनतेला करून देणार आहोत. 

या मेळाव्यात अक्कलकोट तालुका एआयएमआयएम पक्षाचा नूतन अध्यक्षपदी अतिक बागवान, तालुका युवक अध्यक्षपदी सैपन हगलदिवटे, अक्कलकोट शहर अध्यक्षपदी इरफान दावण्णा, शहर युवक अध्यक्षपदी सैपन शेख यांची निवड करण्यात आली. 

या कार्यक्रमाला मौला पठाण, अकिब बागवान, इसाक अत्तार, हुसेन बळोरगी, पालेखान, अश्‍पाक सय्यद, आरिफ शेख, तैयब शेख, मदार मकानदार, इसाक अत्तार, इब्राहिम सुतार, अजीज शेख, रहिमान अत्तार, जुबेर फुलारी, अहमद कुरेशी यांच्यासह एआयएमआयएम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farooq Shabdi said that MIM will come out in full force in all the upcoming elections in Akkalkot taluka