कोरोनाचा वाढता संसर्ग : रेशन दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण; ई-पॉसची सक्ती रद्द करण्याची मागणी

राजाराम माने 
Friday, 11 September 2020

शासनाच्या धोरणानुसार धान्य वितरण करताना पारदर्शकतेसाठी रेशन दुकानात ई-पॉस मशिनवर रेशन कार्डधारकांचे ठसे घेऊन त्यांना धान्य वितरित केले जात होते. परंतु कोरोना विषाणू संसर्गाचा धोका कार्डधारक तसेच रेशन दुकानदारांना होऊ नये म्हणून ई-पॉस कार्डधारकांचे ठसे घेणे बंद केले होते व धान्य वितरित केले जात होते. त्यातच ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा ठसे घेणे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रेशन दुकानदार घाबरले आहेत. 

केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानात मार्च ते जुलै यादरम्यान रेशन कार्डधारकांकडून ई-पॉस मशिनवर ठसे घेणे बंद करण्यात आले होते. परंतु ऑगस्टपासून पुन्हा ठशांची सक्ती केली जात आहे. अद्यापही कोरोनाचा नायनाट झाला नाही तरीही ठसे घेतले जाऊ लागल्याने रेशन दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

शासनाच्या धोरणानुसार धान्य वितरण करताना पारदर्शकतेसाठी रेशन दुकानात ई-पॉस मशिनवर रेशन कार्डधारकांचे ठसे घेऊन त्यांना धान्य वितरित केले जात होते. परंतु कोरोना विषाणू संसर्गाचा धोका कार्डधारक तसेच रेशन दुकानदारांना होऊ नये म्हणून ई-पॉस कार्डधारकांचे ठसे घेणे बंद केले होते व धान्य वितरित केले जात होते. त्यातच ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा ठसे घेणे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रेशन दुकानदार घाबरले आहेत. त्यांच्यात कोरोनाविषयीची भीती आणखीन वाढली आहे. ठसे घेणे बंद केले तर रेशन दुकानदार व कार्डधारक यांना सोयीस्कर होणार आहे. अगोदरच शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागही कोरोनाग्रस्त होत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 

शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरले असून, वेळेत उपचार व हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्याने रुग्ण मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत. त्यामुळे भीती आणखी वाढली आहे. स्वस्त धान्य दुकानदार काळजी, सर्तकता म्हणून मास्क, सॅनिटायझर वापरण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत आहेत. 

याबाबत केत्तूर येथील रेशन दुकानदार बाबासाहेब मोरे म्हणाले, रेशन कार्डधारकांचे ठसे घेण्यासाठी रेशन दुकानदाराचा जवळून संपर्क होत असल्याने संसर्गजन्य कोरोनाचा धोका वाढण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. प्रशासनाने कोरोना संपेपर्यत तरी ठसे घेणे बंद करावे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear among ration shopkeepers because e-pos machine could increase corona infection