
सोलापूर : लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून बंद असलेला यंत्रमाग उद्योग 4 जूनपासून पुन्हा सुरू झाला. मात्र 10 दिवसांपासून सुरू झालेल्या या उद्योगात कोरोनाच्या भीतीने कामगारांची उपस्थिती नगण्य असून, सध्या केवळ 40 टक्केच्या आसपास उत्पादने सुरू आहेत. लॉकडाउनपूर्वी दररोज पाच कोटींची उलाढाल होती ती आता दोन कोटींपेक्षाही कमी आहे. पुढील काही दिवसांत 10-20 टक्के उत्पादने वाढतील, अशी अपेक्षा यंत्रमागधारकांनी व्यक्त केली.
केवळ 40 टक्केच उत्पादने
लॉकडाउन कालावधीत यंत्रमाग उद्योग सुरू होण्यासंदर्भात कारखानदारांनी प्रशासनाकडे सतत मागणी केली होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी महापालिका क्षेत्रात कामगारांना लॉकइन करून अत्यावश्यक सेवेतील उत्पादने घेण्यास परवानगी दिली होती. मात्र कामगारांना लॉकइन करण्यासाठी कारखान्यात आवश्यक जागा व सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ पाच-सहा कारखान्यांतच प्रशासनाच्या नियमावलीनुसार निर्यातक्षम उत्पादने सुरू होती. लॉकडाउन शिथिलीकरणात महापालिका आयुक्तांनी शहरातील यंत्रमाग उद्योग सुरू करण्याची परवानगी दिल्यामुळे यंत्रमागधारकांमध्ये उत्साह दिसून आला. मात्र हा उत्साह थोड्या दिवसांनीच ओसरला. कारण, कोरोनाच्या भीतीमुळे अपेक्षेप्रमाणे सर्व कारखाने सुरू झाली नाहीत व 40 टक्केच उत्पादने सध्या घेतली जात आहेत.
हेही वाचा : रेनकोट, छत्री घ्यायची आहे तर "ही' घ्या काळजी
उत्पादने सुरळीत न होण्याची कारणे
100 टक्के उत्पादने सुरू व्हायला लागेल खूप कालावधी
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कारखानदार व कामगार चिंतेत आहेत. अनेक कामगारही कंटेन्मेंट झोनमध्ये अडकले आहेत. त्यामुळे उपलब्ध कामगारांकडून 40 टक्के उत्पादने सुरू आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत 10 ते 20 टक्के उत्पादने वाढू शकतील, मात्र 100 टक्के उत्पादने सुरू व्हायला खूप कालावधी लागेल. कोरोना आटोक्यात येईपर्यंत उत्पादनांमध्ये सुसूत्रता येणे अशक्य वाटते.
- पेंटप्पा गड्डम,
अध्यक्ष, जिल्हा यंत्रमागधारक संघ, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.