
पहाटे तीनच्या सुमारास जिन्यातून धडधड असा आवाज आला. जिन्यातून घरामध्ये चार चोरटे आत शिरले. त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवला अन् " हिलो मत' म्हणत तिघांसमोर उभा राहिला. उर्वरित तिघेजणांनी घरातील कपाटातील चार तोळ्यांच्या पाटल्या, पाच तोळ्याचे गंठण, चार तोळ्यांच्या बांगड्या, पाच तोळ्यांचे लॉकेट, दोन तोळ्यांचे मिनी गंठण, सोन्याचे इतर दागिने व एक मोबाईल असा सात लाख 61 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
माढा (सोलापूर) : माढ्यातील कोर्टा मागे राहणाऱ्या अमृता जगताप यांच्या राहत्या घरी शुक्रवारी (ता. 8) पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान चार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून सुमारे 22 तोळे सोने व एक मोबाईल असा सात लाख 61 हजारांचा ऐवज लंपास केला.
फिर्यादी अमृता या वडील अमरदीप भांगे, आई अश्विनी व मुलगा प्रथमेश यांच्या सोबत माढ्यातील कोर्टामागे राहतात. गुरुवारी (ता. 7) रात्रीच्या जेवणानंतर दहाच्या सुमारास अमृता, आई व मुलगा हॉलमध्ये झोपले. वडील बेडरूममध्ये झोपले होते. पहाटे तीनच्या सुमारास जिन्यातून धडधड असा आवाज आला. जिन्यातून घरामध्ये चार चोरटे आत शिरले. त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवला अन् " हिलो मत' म्हणत तिघांसमोर उभा राहिला. उर्वरित तिघेजणांनी घरातील कपाटातील चार तोळ्यांच्या पाटल्या, पाच तोळ्याचे गंठण, चार तोळ्यांच्या बांगड्या, पाच तोळ्यांचे लॉकेट, दोन तोळ्यांचे मिनी गंठण, सोन्याचे इतर दागिने व एक मोबाईल असा सात लाख 61 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
चोरीच्या तपासासाठी पोलिसांनी श्वानपथक मागविले होते. मात्र श्वनापथक घराच्या परिसरातच घुटमळले. उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याबाबतचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमूल कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल