शेतकऱ्यांनो बांधावर खत मिळवायचे आहे का? वाचा सविस्तर बातमी 

Fertilizer supply from Agriculture Department to two thousand farmers in Mangalwedha taluka
Fertilizer supply from Agriculture Department to two thousand farmers in Mangalwedha taluka
Updated on

मंगळवेढा (सोलापूर) : जमावबंदी आदेशामुळे शेतीला लागणाऱ्या खतासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सरकारच्या कृषी विभागाने मंगळवेढा तालुक्‍यातील 2000 शेतकऱ्यांना 25 क्विंटल बियाणे व 256 मेट्रिक टन खतांचे बांधावर वाटप केले आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात शेतकऱ्यांची होणारी पळापळ यामुळे थांबली आहे.

तालुक्‍यात पावसाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत करून ठेवल्याने खते, बियाणे घेण्यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी यावे लागते. शहरांमध्ये खते व बियाण्यांची विक्री करणारी दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु पूर्ण साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने जमावबंदीचे आदेश दिले आहेत. पिकावरील कीड नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खतांची खरेदी करणे शक्‍य होत नाही. म्हणून शक्‍य शेतकऱ्यांच्या शेतावर खते व बियाणे उपलब्ध करून देण्याची मोहीम आखली. तालुक्‍यात कृषी विभागाने आत्मा अंतर्गत गावोगावी शेतकऱ्यांचे गट स्थापन केले. त्या गटातील शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना आवश्‍यक असलेली खते व बियाणेची मागणी एकत्र करून ती तालुक्‍यातील मुख्य डीलरकडे केली जाते. तसेच खताची किंवा बियाण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी असेल तर थेट कंपनी प्रतिनिधीशी बोलून डीलरचा दर किंवा त्यापेक्षाही कमी दराने खते व बियाणे उपलब्ध करून दिली जातात. याचाच एक भाग म्हणून हुन्नूर येथील उत्कर्ष शेतकरी स्वमय सहाययता गटाला 20 टन खते झुअरी कंपनीचे जिल्हा प्रतिनिधीशी चर्चा करून अगदी कमी दराने मिरजेतून थेट शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोच केली. त्यामुळे शेतकऱ्यांना तालुक्‍याच्या ठिकाणी जाण्यायेण्याचा खर्चासहीत वाहतूक खर्च वाचला. कोरोना धर्तीवर दुकानात गर्दी न झाल्यामुळे करोनापासून संसर्गापासून सुटका झाली.याशिवाय दुकानदार शेतकऱ्यांना पाहिजे त्या खताबरोबर इतर नको असलेले खते गळ्यात मारतात त्यापासूनही सुटका झाली. 
उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे म्हणाले, हवामान खात्याचा अंदाजही ही चांगल्या पावसाचा आहे. त्यादृष्टीने आत्मा योजनेतील त सर्व गट व कृषी मित्र, कृषी सहाय्यकांनी गावात जाऊन या योजनेचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. कोणत्या गटांना, कोणत्या कंपनीचे बियाणे, त्याचे वाण किंवा जाती याची मागणी आपल्या गावातील कृषी सहायक याचेकडे करावी. एकत्रित मागणी थेट कंपनीस करतील. याचा लाभ शेतकय्रांनी घ्यावा. 
शेतकरी धोंडीराम माने म्हणाले, लॉकडाऊनमुळे मला डाळिंबच्या खतासाठी मंगळवेढ्यास जाणे- येणे शक्‍य नव्हते. परंतु कृषी खात्याने ते खत जाग्यावर उपलब्ध केल्याने माझा वेळ, त्रास वाचल्याने त्यात लाभ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com