दोन हजार शेतकऱ्यांना बांधावर दिले खते व बियाणे

khatvatap.jpg
khatvatap.jpg
Updated on

मंगळवेढा(सोलापूर)ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतीला लागणाऱ्या खतासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने दोन हजार शेतकऱ्यांना 25 क्विंटल बियाणे व 256 मेट्रिक टन खतांचे बांधावर वाटप केले. कृषी खात्याच्या या मदतीमुळे कोरोना संकटात शेतकऱ्यांची होणारी पळापळ थांबली. 

शेतकऱ्यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत करून ठेवल्याने खते, बियाणे घेण्यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी यावे लागते. शहरांत खते व बियाण्यांची विक्री करणारी दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर खते व बियाणे उपलब्ध करून देण्याची मोहीम आखली. 

तालुक्‍यात कृषी विभागाने आत्मा अंतर्गत गावोगावी जे शेतकऱ्यांचे गट स्थापन केले त्या गटातील शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना आवश्‍यक असलेली खते व बियाणांची मागणी एकत्र करून ती तालुक्‍यातील मुख्य डीलरकडे केली जाते. तसेच खताची किंवा बियाणांची मोठ्या प्रमाणावर मागणी असेल तर थेट कंपनी प्रतिनिधीशी बोलून डीलरचा दर किंवा त्यापेक्षाही कमी दराने खते व बियाणे उपलब्ध करून दिली जातात. 
हुन्नूर येथील उत्कर्ष शेतकरी स्वयंसहायता गटास 20 टन खते झुआरी कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा करून अगदी कमी दराने खते मिरजेतून थेट शेतकऱ्यांच्या शेतावर पोच केली. त्यामुळे शेतकऱ्यांना तालुक्‍याच्या ठिकाणी जाण्यायेण्याचा खर्चासहीत वाहतूक खर्च वाचला. कोरोना संसर्गापासून सुरक्षितपणे खते बांधावर मिळाली. 

मागणी मिळताच खते व बियाणे मिळेल 
हवामान खात्याचा अंदाजही चांगल्या पावसाचा आहे. त्यादृष्टीने आत्मा योजनेतील सर्व गट व कृषी मित्र, कृषी सहायकांनी गावात जाऊन या योजनेचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. कोणत्या गटांना कोणत्या कंपनीचे बियाणे, त्याचे वाण किंवा जाती याची मागणी आपल्या गावातील कृषी सहायक यांच्याकडे करावी. एकत्रित मागणी थेट कंपनीस करतील. 
- रवींद्र कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी 

वाहतुकीची धावपळ वाचली 
लॉकडाउनमुळे मला डाळिंब पिकाच्या खतासाठी मंगळवेढ्यास जाणे-येणे शक्‍य नव्हते. परंतु कृषी खात्याने ते खत बांधावर उपलब्ध केल्याने माझा वेळ व वाहतुकीचा त्रास वाचला. 
-धोंडीराम माने, शेतकरी, भाळवणी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

pratap sarnaik and pankaj dhaware
Solapur MLC election controversy
Nomination Scrapped After Objection on Forged Signature; BJP Rival Still Uncertain
Farmers Stand Firm Despite Rain as Collector Meeting Ends Without Resolution
Marathi News Esakal
www.esakal.com