esakal | सोलापुरात लढायला दुसरे महास्वामी म्हणतात "मै हु ना' (video)
sakal

बोलून बातमी शोधा

Fielding for Lok Sabha byelection in Solapur

एकीकडे पोट निवडणुकीची चर्चा रंगत असतानाच दुसरीकडे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील अपिलाच्या माध्यमातून खासदार महास्वामी पाच वर्षे काढतील असाही अंदाज बांधला जात आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्याने सोलापूरच्या संभाव्य पोटनिवडणूकीबद्दल जोरदार चर्चा रंगत आहे.

सोलापुरात लढायला दुसरे महास्वामी म्हणतात "मै हु ना' (video)

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांचे बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अमान्य केले आहे. या जागेवर पोटनिवडणूक झाल्यास भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि कॉंग्रेसकडून कोण लढणार? या बद्दल सोलापूरच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपकडून ही पोटनिवडणूक लढण्याची इच्छा आणखी एका महास्वामींनी व्यक्त केली आहे. 
एकीकडे पोट निवडणुकीची चर्चा रंगत असतानाच दुसरीकडे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील अपिलाच्या माध्यमातून खासदार महास्वामी पाच वर्षे काढतील असाही अंदाज बांधला जात आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्याने सोलापूरच्या संभाव्य पोटनिवडणूकीबद्दल जोरदार चर्चा रंगत आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चडचण येथील श्री व्यंकटेश्‍वर महास्वामीजी (डी. जी. कटकधोंड) यांनी हिंदुस्थान जनता पार्टीच्यावतीने निवडणूकही लढविली होती. हेच महास्वामी आता सोलापूरची पोट निवडणूक झाल्यास भाजपकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करू लागले आहेत. त्यासाठी कर्नाटकमार्गे दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्यांशी त्यांनी संपर्कही सुरू केला आहे. या महास्वामींकडे ढोर समाजाचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याने भविष्यात जात प्रमाणपत्राचा धोका उद्‌भवण्याची शक्‍यता कमीच आहे. 
श्री व्यंकटेश्‍वर महास्वामीजी (डी. जी. कटकधोंड) यांनी सार्वत्रिक निवडणुकीत सादर केलेल्या शपथ पत्रात त्यांची संपत्ती फक्त नऊ रुपये दाखविल्याने हे महास्वामीची चर्चेचा विषय झाले होते. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांना न्यायालयात नक्कीच न्याय मिळेल. त्यामुळे सोलापूरची पोटनिवडणूक होणार नाही अशी शक्‍यता श्री व्यंकटेश्‍वर महास्वामीजी (डी. जी. कटकधोंड) यांनी व्यक्त केली आहे. जर पोटनिवडणूक झाली तर आपण भाजपकडून इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. 

मी पाहिला खासदारांचा जात दाखला 
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतच खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेण्यात आला होता. तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सर्व उमेदवारांना बोलावून खासदार महास्वामींचा बेडा जंगम जातीचा दाखला आम्हाला दाखविला असल्याची माहिती श्री व्यंकटेश्‍वर महास्वामीजी (डी. जी. कटकधोंड) यांनी दिली. खासदार महास्वामींनी या दाखल्याची झेरॉक्‍स प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

go to top