कुत्र्यांची शर्यत पडली महागात ! 17 जणांविरोधात गुन्हा; कोळा येथील घटना

दत्तात्रय खंडागळे 
Saturday, 12 September 2020

पाळीव प्राण्यांच्या शर्यती भरवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असताना तसेच सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश असतानाही कोळा (ता. सांगोला) हद्दीतील फॉरेस्टमधील मोकळ्या जागेत 10 सप्टेंबर रोजी दुपारी पै. लक्ष्मण कंराडे, सागर भाऊ करांडे, अजित शेदाळ यांनी कुत्र्यांच्या शर्यतीचे आयोजन केले होते. यात 17 जणांविरुद्ध सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

सांगोला (सोलापूर) : पाळीव प्राण्यांच्या शर्यती भरवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. असे असतानाही कुत्र्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची घटना कोळा (ता. सांगोला) गाव हद्दीतील कुराण फॉरेस्टमधील मोकळ्या जागेत 10 सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. याबाबत 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी, की पाळीव प्राण्यांच्या शर्यती भरवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असताना तसेच सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश असतानाही कोळा (ता. सांगोला) हद्दीतील फॉरेस्टमधील मोकळ्या जागेत 10 सप्टेंबर रोजी दुपारी पै. लक्ष्मण कंराडे, सागर भाऊ करांडे, अजित शेदाळ यांनी कुत्र्यांच्या शर्यतीचे आयोजन केले होते.

यात गणेश अशोक मोरे (रा. दानोळी, ता. शिरोळ), अनिल दर्याप्पा निळे (रा. जालीहाळ, ता. मंगळवेढा), सुनील पोपट चव्हाण (रा. एखतपूर, ता. सांगोला) उदय अरुण माने (रा. दानोळी, ता. शिरोळ), प्रतीक देवेंद्र मरडे (रा. अंकली, ता. मिरज), ओंकार संजय भोसले (रा. आळती, ता. हातकणंगले), संजय मनोहर चौगुले (रा. जालीहाळ, ता. मंगळवेढा), काशिलिंग हिंदुराव मंडले (रा. एखतपूर, ता. सांगोला), बाळासाहेब सोपान खांडेकर (रा. मदनेवस्ती, कोळा, ता. सांगोला), बजरंग तुळशीराम माने, धनाजी जगन्नाथ पाटील (दोघे रा. घाणंद, ता. आटपाडी), दत्तात्रय बाळासाहेब वाघमोडे (रा. सावे, ता. सांगोला), सदाशिव मधुकर बिचुकले (रा. बामणी, ता. सांगोला) या 17 जणांविरुद्ध सांगोला पोलिसांनी भा.दं.वी. क्र 188, 270, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब), महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 चे कलम 37(3)/135 साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1969 चे कलम 11(1)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case against seventeen people for organizing a dog race at Kola