बनावट खतनिर्मीती व विक्री प्रकरणी करमाळ्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल 

crime.jpg
crime.jpg
Updated on

करमाळा, (सोलापूर) :झुआरी केमिकल्स लिमिटेड गोवा या कंपनीच्या जय किसान ब्रँड मधून बनावट पोट्याश खताची विक्री प्रकरणी करमाळा पोलिसात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणातून बनावट खतनिर्मिती व विक्री करणारी टोळीचा शोध सुरू करण्यात आला आहे.
या घटनेमुळे शेतकरी वर्गात असंतोषचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी मोहन सुतार रा. कागल,जि. कोल्हापूर, अक्षय काशीद रा. कन्हेरगाव, ता. माढा,जि सोलापूर, खत दुकानदार निलेश खानावरे, रा.वाशिंबे ता.करमाळा, जि.सोलापूर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खत निरीक्षक तथा जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सागर नवनाथ बारवकर यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. वरील तिघांविरुद्ध भा द वि ४२० ३४ रासायनिक खत कायदा १९ ३५  ऑब्लिक एक चार अत्यावश्यक वस्तू कायदा अधिनियम १९५५ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत हकीकत अशी की, गोपनीय माहितीच्या आधारे सोलापूर जिल्ह्यात जय किसानच्या हुबेहूब बनावट पिशव्यांमध्ये भरून पोट्याश बनावट खत विकत असल्याची खात्रीशीर माहिती कृषी विभागाला मिळाली, यावरून सहयोग कृषी सेवा केंद्र वाशिंबे येथे खत निरीक्षक तथा जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सागर नवनाथ बारवकर ,तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील, कृषी सहाय्यक उमाकांत जाधव, दादासाहेब नवले, झुआरी कंपनीचे अक्षय सावंत यांनी तपासणी केली. यावेळी दुकानात बनावट खताच्या गोण्या आढळून आल्या नाहीत. याबाबत दुकानदाराला विचारल्यास त्याने मी पन्नास गोण्या साडेआठशे रुपयांप्रमाणे विकली असल्याचे सांगितले. आपण हे पोट्याश अक्षय काशीद रा. कन्हेरगाव यांच्याकडुन खरेदी केले असल्याचे सांगितले. त्यांच्या पावत्या आहे का? असे विचारल्यास खानावरे यांने आपल्याला अक्षय काशीद रा. कन्हेरगाव यांने पावत्या दिल्या नसल्याचे सांगितले. 
सखोल तपास केला असता शेतकरी अर्जुन राजाराम गावडे रा. गोयेगांव,ता.करमाळा, जि.सोलापुर या शेतकऱ्याने आठ पोते पोट्याश खरेदी केल्याचे समजले. त्यापैकी त्याच्या घरी दोन पोते शिल्लक होते या पोत्याची पाहणी करून जय किसान कंपनीचे अधिकारी अक्षय सावंत यांनी या खताच्या पिशव्या बनावट असल्याचे सांगितले. सहयोग कृषी सेवा केंद्र वाशिंबेचे मालक निलेश खानावरे यांनी एकुण ७२० बॅग बनावट खत विकल्याचे समोर आले आहे. त्यांची किंमत ४ लाख ८९ हजार ६०० ऐवढी आहे. 
सोलापूर जिल्ह्यात बनावट पोट्याश विकणाऱ्या अक्षय काशीद याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की मी हे पोट्याश भांगे,ता.कागल जि. कोल्हापूर येथील मोहन सुतार यांच्याकडून गेली वर्षभरापासून खरेदी करून सोलापूर जिल्ह्यात विक्री करत होतो व या सर्व मालाची रक्कम मी गोळा करून मोहन सुतार यांच्या खात्यावर भरली आहे.
यावेळी या सोलापूरचे कृषी गुणनियंत्रण अधिकारी  सागर बारवकर म्हणाले की, बनावट पोट्याश विक्रीचे रॅकेट संपुर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात असल्याचा आमचा अंदाज आहे. बनावट जय किसान पोट्याशची पिशवी ओरिजनल पिशवी याच्या कलर व प्रिंटमध्ये फरक आहे. ज्या शेतकऱ्यांना शंका आहे की, आपल्या जयकिसान पोट्याशमध्ये फसवणूक झालेली आहे. अशा शेतकऱ्यांनी मोकळ्या पिशव्या घेऊन कृषी विभागाशी संपर्क साधावा.  

जवळपास ६०० मेट्रिक टन या बनावट पोट्याश खतांची विक्री
करमाळा तालुक्यातील उमरड, जिंती, पारेवाडी, वांगी, चिखलठाण या भागात सुध्दा या बनावट पोट्याश खताची विक्री गेली सहा महिन्यात मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. याप्रकरणात महाराष्ट्रातील रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या खत विक्रेत्यांचा पर्दाफाश होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार करमाळा तालुक्यात जवळपास ६०० मेट्रिक टन या बनावट पोट्याश खतांची विक्री झालेली आहे..


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com