esakal | बेकायदेशीर सावकारकीत अडकला पंढरपूर भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्ष !

बोलून बातमी शोधा

Money Lender}

भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष विदुल पांडुरंग अधटराव यांच्या विरुद्ध पोलिसांनी बेकायदेशीर सावकारी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडे आलेल्या तक्रारी अर्जावरून पोलिसांनी सहकार अधिकारी प्रदीप सावंत यांच्या उपस्थितीत अधटराव यांच्या घराची तपासणी केली असता 48 चेक, 9 हिशेब वह्या, कोरा स्टॅम्प, बॅंक पासबुक्‍स व चेकबुक्‍स तसेच 29 हजार 340 रुपये रोख सापडले. 

बेकायदेशीर सावकारकीत अडकला पंढरपूर भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्ष !
sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष विदुल पांडुरंग अधटराव यांच्या विरुद्ध पोलिसांनी बेकायदेशीर सावकारी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडे आलेल्या तक्रारी अर्जावरून पोलिसांनी सहकार अधिकारी प्रदीप सावंत यांच्या उपस्थितीत अधटराव यांच्या घराची तपासणी केली असता 48 चेक, 9 हिशेब वह्या, कोरा स्टॅम्प, बॅंक पासबुक्‍स व चेकबुक्‍स तसेच 29 हजार 340 रुपये रोख सापडले. 

या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की पंढरपूर शहर व तालुक्‍यात खासगी सावकारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातूनच पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात विदुल अधटराव यांच्या विरोधात एक तक्रारी अर्ज देण्यात आला होता.

पोलिसांनी सहकार अधिकारी प्रदीप सावंत यांच्या उपस्थितीत अधटराव यांच्या संत पेठ येथील घरात जाऊन तपास केला, तेव्हा पोलिसांना 48 चेक, 9 हिशेब वह्या, कोरा स्टॅम्प, बॅंक पासबुक्‍स व चेकबुक्‍स तसेच 29 हजार 200 रुपये रोख सापडले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रशांत संजय भागवत यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी त्यावरून अधटराव यांच्या विरोधात अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. जगदाळे हे पुढील तपास करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल