लॉकडाऊनमध्ये स्वगृही येण्यासाठी इच्छुकांनी लिंकवर माहिती भरावी

Fill out an application to come to your own home
Fill out an application to come to your own home
Updated on

अक्कलकोट (सोलापूर) : राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना अक्कलकोट विधानसभेतील गावात यायचे आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने कार्यपद्धती निश्चित केली आहे.

राज्यात आणि देशात कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत जनतेला मदत होण्याकरिता माननीय पीठासीन अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशनुसार विधानभवन, मुंबई येथे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. ज्या नागरिकांना अक्कलकोट विधानसभेतील गावात यायचे आहे, अशा नागरिकांची तपशीलवार माहिती ई- मेल करण्याचे सूचना विधानसभा सदस्य म्हणून मला मिळालेली आहे. तरी आपण https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdslThxUGfMBRVFSm3ZRANXjhJvtTHLftDFdKg3un6ZApI6Dw/viewform या लिंकवर जाऊन फॉर्ममध्ये आपली अचूक माहिती भरावे, जेणेकरून आपल्याला आणण्यासाठी प्रयत्न करता येईल. हे लिंक भरण्यास काही अडचण आल्यास खाली दिलेल्या व्यक्तींच्या व्हाट्सअप्प नंबरवर माहिती पाठवावी. ज्यात धनंजय गाढवे (7798238999), प्रदीप पाटील (7038701014),
शिवशंकर स्वामी  (9881214190), अप्पाशा पुजारी (9923260789) आदींचा समावेश आहे. परत येण्याबाबतचे निर्णय शासन स्थरावरच होणार असून त्यांनी ठरविलेल्या नियम, अटी आणि निकष पाळून सर्वांना परत आणण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. हा फॉर्म भरणे म्हणजे परत येण्याची परवानगी मिळाली असे गृहीत धरू नये, असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com