लिपिकांच्या पदोन्नतीची 28 नोव्हेंबरला अंतिम "परीक्षा' ! नापास झाल्यास मिळणार मूळ वेतन

तात्या लांडगे
Wednesday, 4 November 2020

आयुक्‍तांच्या आदेशानुसार...

 • टंकलेखन व संगणकीय परीक्षेत नापास झाल्यास लिपिकांना पदावनत केले जाईल
 • लिपिक संवर्गातील म्हणजे कनिष्ठ श्रेणी लिपिक नापास झाल्यास तो मूळ वेतनावर येईल
 • 50 वर्षे पूर्ण झालेल्या लिपिकांची केवळ संगणकावर मराठी टंकलेखन परीक्षा
 • 50 पेक्षा कमी वयोगटातील लिपिकांना टंकलेखन व संणकीय ज्ञानाची परीक्षा द्यावी लागणार
 • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजीत 40 चा वेग बंधनकारक

सोलापूर : महापालिकेतील सुमारे सव्वापाचशे कर्मचाऱ्यांना कनिष्ठ, वरिष्ठ श्रेणी लिपिक, वरिष्ठ मुख्य लेखनिक आणि कार्यालय अधिक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. मात्र, धक्‍कादायक बाब म्हणजे त्यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांना संगणकाचे ज्ञानच नाही. तर काहींना संगणकावर मराठी किंवा इंग्रजी टायपिंगच येत नसल्याचे समोर आले. ही बाब निर्दशनास आल्यानंतर महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी त्यांची "परीक्षा' घेण्याचे ठरवले. पहिली परीक्षा झाली, परंतु 75 टक्‍क्‍यांहून अधिकजण नापासच झाले. त्यांना दुसरी संधी देण्यासाठी 28 नोव्हेंबर रोजी पुन्हा परीक्षा होणार असून या परीक्षेत नापास झाल्यास त्यांना मूळ वेतनावर आणले जाणार आहे.

 

आयुक्‍तांच्या आदेशानुसार...

 • टंकलेखन व संगणकीय परीक्षेत नापास झाल्यास लिपिकांना पदावनत केले जाईल
 • लिपिक संवर्गातील म्हणजे कनिष्ठ श्रेणी लिपिक नापास झाल्यास तो मूळ वेतनावर येईल
 • 50 वर्षे पूर्ण झालेल्या लिपिकांची केवळ संगणकावर मराठी टंकलेखन परीक्षा
 • 50 पेक्षा कमी वयोगटातील लिपिकांना टंकलेखन व संणकीय ज्ञानाची परीक्षा द्यावी लागणार
 • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजीत 40 चा वेग बंधनकारक

महापालिकेत शिपायासह अन्य पदांवर काम करणाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार कनिष्ठ, वरिष्ठ श्रेणी लिपिक, वरिष्ठ मुख्य लेखनिक व कार्यालय अधिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली. मात्र, त्यांना टायपिंग व संगणकाची माहिती नसल्याने प्रशासकीय काम करताना अडचणी येऊ लागल्या आहेत. अनेक लोकप्रतिनिधींनी त्याबाबत आयुक्‍तांसह संबंधित विभागप्रमुखांकडे तक्रारी केल्या. त्यानंतर आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी पदोन्नतीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मूळ पदावर येण्याच्या भीतीने अनेकांनी कामगार संघटनांच्या माध्यमातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले. दुसरीकडे आमदार प्रणिती शिंदे यांचीही भेट घेतली. तरीही आयुक्‍त परीक्षा घेण्यावर ठाम राहिले आणि लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर त्यांनी लिपिकांना आणखी एक संधी देण्याचे मान्य केले. त्यानुसार आता दुसरी संधी दिली जाणार असून तत्पूर्वी आयुक्‍तांनी ऑगस्टमध्ये परीक्षा घेतल्यानंतर सर्वांना सराव करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर काहींनी विविध कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेतली तर काहीजण सेवानिवृत्त झाले असून आता सुमारे 517 लिपिक असून त्यांना परीक्षा द्यावीच लागणार आहे.

पदोन्नतीवरील लिपिकांची स्थिती

 • एकूण लिपिक
 • 563
 • 50 वर्षांवरील लिपिक
 • 330
 • 50 वर्षांखालील लिपिक
 • 218
 • दिव्यांग लिपिक
 • 25
 • वेतनावरील दरमहा खर्च
 • 3.82 कोटी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The final examination for the promotion of clerks on November 28; Failure do so result in basic pay