श्री विठ्ठलालाही लॉकडाऊनचा आर्थिक फटका

 The financial blow of lockdown also hit God Vitthal
The financial blow of lockdown also hit God Vitthal
Updated on

पंढरपूर : येथील श्री विठ्ठलालाही कोरोनाच्या लॉकडाऊनचा आर्थिक फटका बसला आहे. गतवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात मिळालेल्या उत्पन्नाच्या तुलनेत लॉकडाऊनच्या काळात विठुरायाची तिजेरी रितीच राहिली आहे.

लॉकडाऊन काळामध्ये मंदिर बंद असलेल्याने सुमारे 6 कोटी 40 लाख रुपयांचा आर्थिक फटका मंदिर समिताला बसला आहे. ऐकीकडे मंदिर समितीचे उत्पन्न बंद असले तरी दुरीकडे मंदिर समितीचे भुकेल्यांसाठी अन्नदान सुरु आहे. दररोज 3 हजार लोकांना फूड पॅकेट वाटप केले जात आहे. मंदिर समितीच्या या सामाजिक उपक्रमाला भाविकांनी ऑनलाईन देणगी देवून हातभार लावावा, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी आज सकाळ शी बोलताना केले आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विश्वाची माऊली असलेल्या विठुरायाचे मंदिर 17 मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद केले आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या एकदम ठप्प झाली आहे. मंदिर दर्शनासाठी बंद झाल्यामुळे मंदिर परिसरातील प्रासादिक वस्तूंची बाजारपेठ देखील लॉकडाऊन आहे. पंढरीत भाविक येत नसल्याने येथील बाजार पेठेवर जसा आर्थिक परिणाम झाला आहे. तसाच देवाच्या तिजोरीवर देखील झाला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून साक्षात भगवंताची दानपेटी खाली झाली आहे. 


दर्शनासाठी मंदिर बंद करुन आज 54 दिवस पूर्ण झाले. याकाळात मंदिर समितीला विविध स्वरुपात मिळणारे सुमारे 6 कोटी 40 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न बुडाले आहे. मंदिराचे उत्पन्न घटल्याने मंदिर समितीवर आर्थिक ताण वाढला आहे. मंदिराचे उत्पन्न बंद असतानाही मंदिर समितीने शहरातील निराधार, निराश्रीत, अंध, अपंग, भिक्षेकरी अशा लोकांसाठी अन्नदान सुरु केले आहे. या शिवाय शहरात मोकाट आणि बेवारस फिरणाऱ्या मुक्‍या जनावरांना देखील चारा आणि पाण्याची सोय केली आहे. बार्डी (ता. पंढरपूर) येथील 300 वन गाईंसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था मंदिर समितीने केली आहे. 


सर्वसामान्य विठ्ठल भक्तांनी दिलेल्या देणगीमधूनच समितीने भुकेलेल्यांना अन्न आणि पाणी देवून माणसात देव शोधला आहे. भाविकांच्या हाकेला धावणारा विठुराया खरोखरच लॉकडाऊनच्या काळात मंदिर समितीच्या अधिकारी आणि कर्मचार्यांच्या रुपाने आज शहरातील गोरगरीबांच्या मदतीसाठी धावून आल्याची भावना लोकांमधून व्यक्त केली जात आहे. 


3 लाखांची ऑनलाईन देणगी 
17 मार्चपासून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने रोख स्वरुपातील देणगी बंद झाली आहे. तरीही दूरस्थ राहून विठ्ठलाची मनोभावे सेवा करणाऱ्या काही विठ्ठल भक्तांनी लॉकडाऊनच्या काळात देखील 3 लाख 25 हजार रुपयांची ऑनलाईन देगणी विठूराया चरणी अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. 

ऑनलाईन देणगीतून हातभार लावावा 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी 17 मार्च पासून बंद आहे. मंदिर बंद असल्यामुळे मंदिराच्या उत्प्न्नावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या 54 दिवसांमध्ये मंदिर समितीचे जवळपास 6 कोटी 40 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. उत्पन्न बंद असले तरी लोकांच्या मदतीसाठी समिती काम करत आहे. समितीच्या या सामाजिक उपक्रमासाठी ऑनलाईन देणगी देवून हातभार लावण्याची गरज आहे. 
- विठ्ठल जोशी, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com