तुमच्या ग्रामपंचायतीला सरकारने किती निधी दिला व तो कुठे खर्च झाला? पाहा घरबसल्या ऑनलाइन

Gram Swaraj
Gram Swaraj

सोलापूर : आपल्या ग्रामपंचायतीनं गावाचा काहीच विकास केला नाही... इतका निधी जातो कुठे? असे अनेक प्रश्‍न व शंका गावकऱ्यांच्या मनात उपस्थित होत असतात. काही वेळा ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर आरोप केले जातात तर प्रसंगी पुढील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या सदस्यांना घरचा रस्ताही दाखवला जातो. परंतु, ग्रामपंचायतीने खरंच विकास केला का? किंवा निधी खर्च झाला का? याबाबतची माहिती आपण घरबसल्या जाणून घेऊ शकता... 

पंचायत राज दिनी (24 एप्रिल 2020) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "ई-ग्राम स्वराज' या मोबाईल ऍप्लिकेशनचं लोकार्पण केलं. त्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, या ऍपवर ग्रामपंचायतीच्या विकासकामांची सविस्तर माहिती मिळू शकेल. ग्रामपंचायतीसाठी दिलेला एकूण निधी, तो निधी कुठे खर्च झाला याबाबत सर्व माहिती उपलब्ध असेल. याद्वारे गावाचा कोणताही नागरिक आपल्याला ग्रामपंचायतीत काय सुरू आहे, काय काम सुरू आहे, ते कुठंवर आलं आहे ही सर्व माहिती आपल्या मोबाईलवरून पाहू शकेल. 

जाणून घ्या ही माहिती कशी पाहायची ती 

ग्रामपंचायतीनं किती निधी कुठल्या कामासाठी खर्च केला? 

  • हे जाणून घेण्यासाठी आधी तुम्हाला गूगल प्ले स्टोअरवरून "ई-ग्राम स्वराज' नावाचं ऍप डाउनलोड करावं लागेलऍप ओपन झाल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल 
  • यात आधी "स्टेट'मध्ये तुमचं राज्य, त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये तुमचा जिल्हा, ब्लॉक पंचायतमध्ये तालुका आणि व्हिलेज पंचायतमध्ये गावाचं नाव निवडा 
  • ही माहिती भरून झाल्यावर की तुम्हाला "सबमिट' या बटणावर क्‍लिक करावं लागेल. 
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यात टॉपला आपण जी माहिती भरलेली असते, ती दिसेल. यात राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव दिसेल. गावाच्या नावासमोर गावाचा कोड क्रमांकही दिसेल 
  • त्याखाली तुम्हाला ज्या आर्थिक वर्षासाठीची माहिती पाहायची आहे, ते वर्ष निवडायचं आहे 
  • त्यानंतर तुमच्यासमोर तीन वेगवेगळे पर्याय येतात. यातला सगळ्यात पहिला पर्याय असतो ER Details. यामध्ये ER म्हणजेच elected representative म्हणजेच गावातील निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती असते 
  • या पर्यायावर क्‍लिक केलं की तुम्हाला गावातील सरपंच, सचिव व ग्रामपंचायत सदस्यांची सविस्तर माहिती दिसेल. त्यांचे नाव, पद, वय, जन्मतारीख अशी माहिती असते. 
  • हे ऍप नुकतेच लॉंच करण्यात आल्यामुळे यात माहिती भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यामुळे सगळ्याच गावांमधील निवडून आलेल्या प्रतिनिधींची नावे यात तुम्हाला दिसतीलच असे नाही. पण, असं असलं तरी गावाच्या विकासकामासाठी सरकारनं किती पैसा दिला आणि त्यातला किती पैसा ग्रामपंचायतीनं खर्च केला, हे मात्र तुम्ही नक्कीच पाहू शकता. 
  • त्यानंतर दुसरा पर्याय आहे तो Approved activities. यात ग्रामपंचायतीला कोणत्या कामांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला ते सांगितलेलं असतं. 
  • त्यानंतर तिसरा पर्याय असतो Financial Progress. यात गावाच्या आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिलेली असते. 
  • या पर्यायावर क्‍लिक केल्यास एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यात आपण जे आर्थिक वर्ष निवडलेलं असतं ते सुरवातीला तिथं दिलेलं असतं. त्यानंतर गावाचा कोड आणि नाव दिलेलं असतं. 
  • त्यानंतर त्या आर्थिक वर्षात तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम receipt या पर्यायासमोर दिलेली असते. आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला, ही रक्कम expenditure या पर्यायासमोर दिलेली असते. 
  • त्याखाली List of schemes हा पर्याय असतो. यामध्ये ग्रामपंचायतीला जो एकूण निधी मिळाला, त्याची विभागणी केलेली असते. यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला व त्यापैकी किती निधी खर्च झाला याची माहिती असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com