बापरे.. आगीत जळाली लग्नासाठी जमवलेली रोकड!

बापरे.. आगीत जळाली लग्नासाठी जमवलेली रोकड!

सोलापूर : कोनापूरे चाळ परिसरात आग लागून चंदू भंडारे यांच्या घरांतील साहित्याचे मोठे नुकसान झाले. या आगीच्या घटनेत भंडारे यांच्या मुलाच्या लग्नासाठी जमवून ठेवलेली जवळपास सव्वा लाखांची रक्कम जळाली आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

चावट पाटलाचा पराक्रम; मुलींना अशा प्रकारे करायचा हाय

शॉर्ट सर्कीटने लागली आग 
मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास शॉर्टसर्किटने कोनापूरे चाळीतील चंदू भंडारे यांच्या घरात आग लागली. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले. धूर येत असल्याने परिसरातील नागरिकांना आग लागल्याचे लक्षात आले. परिसरातील तरुणांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घरातील गॅसच्या टाक्‍या तत्काळ बाहेर काढल्या. तसेच आगीतून घरातील साहित्य वाचता येईल का? यासाठी धडपड केली. या घटनेत भंडारे यांच्या मुलाच्या लग्नासाठी जमवून ठेवलेली जवळपास सव्वा लाखांची रोकड जळाल्याची माहिती पुढे आली आहे. भंडारे टेलर आहेत तर त्यांचा मुलगा एसी रिपेअरीचे काम करतो. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तसेच पोलिसांनी धाव घेतली आहे. 

सोलापूर जिल्ह्यात माजी सैनिकाचा खून

टेक्‍स्टाईल कारखान्याला आग 
लोकसेवा हायस्कूल परिसरातील एका टेक्‍स्टाईल कारखान्याला सोमवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली. तोपर्यंत परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलास आगीची माहिती कळविली होती. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. अंबादास साखरे यांच्या मालकीचा हा कारखाना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com