पाण्याचा फवारा मारत वाचविला 70 वर्षीय आजीचा जीव

पाण्याचा फवारा मारत वाचविला 70 वर्षीय आजीचा जीव
Updated on


सोलापूर - मध्यरात्रीचे 12 वाजलेले...अचानक एका तळमजल्यातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले...त्या ठिकाणी असलेल्या कारखान्याला आग लागली होती.. तळमजल्यात कारखाना आणि वरच्या मजल्यावर निवास असे या इमारतीचे स्वरुप होते... वरच्या मजल्यावरील तरुण सर्वजण पळत खाली आले पण 70 वर्षीय आजी वर अडकल्या.. घरातील प्रत्येकजण आरडाअोरड करू लागला... त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आपला जीव धोक्यात घालून आजीला पाण्याच्या फवाऱ्याचे संरक्षण देत आगीतून बाहेर काढले आणि तिचा जीव वाचवला.

सोलापूरच्या हद्दवाढ भागात असलेल्या शेळगी परिसरातील जय लक्ष्मी सोसायटीत मध्यरात्री बाराच्या सुमारास आग लागली. या आगीचे स्वरुप भीषण होते. आग लागल्याचे पाहिल्यावर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर झोपलेले रहिवाशी खाली पळत आले. सर्वत्र आगीचा डोंब उसळला होता. आगीने भयाण स्वरुप घेतले, आगीच्या ज्वाळा पहिल्या मजल्यापर्यंत भडकल्या. खाली येण्याच्या गदारोळात घरामध्ये 70 वर्षीय आजी असल्याचे ध्यानातच आले नाही. हे ध्यानात आल्यावर घरच्यांनी तातडीने त्याची कल्पना अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. आजी दुसऱ्या मजल्यावर अडकल्या होत्या. 

आगीत ज्येष्ठ महिला अडकल्याचे समजल्यावर जवानांनीही आपले कसब पणाला लावले. आजीला जीन्यावरून आणायचे होते आणि सर्वत्र धुर आणि आगीच्या ज्वाळा पसरल्या होत्या. अशा स्थितीत आजीला आणणे धोक्याचे होते. जवान आजीपाशी पोचले, त्यावेळी त्यांचे पाय लटपटत होते. जवानांनी त्यांना धीर दिला. एका जवानाने आजीला पाठिवर घेतले आणि दुसऱ्या जवानाने पाण्याचा फवारा सुरु केला. पाण्याच्या फवाऱ्यामुळे आगीच्या ज्वाळांची दिशा बदलली. त्यावेळी आजीच्या भोवती पाण्याचा फवारा मारत मारत अतिशय अडचणीच्या स्थितीत जिन्यावरून खाली आणले. आगीच्या संकटातून वाचल्यामुळे आजीच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. त्यांच्या कुटुंबियांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले. अनुसया बालय्या येमूल असे या आजीचे नाव आहे.

तीन तासानंतर आटोक्यात आली आग
शेळगीतील लक्ष्मी सोसायटीतील कारखान्याला मध्यरात्री 12 वाजता लागलेली आग पहाटे तीन वाजता आटोक्यात आली. त्यासाठी 30 गाड्यातून पाणी मारावे लागले. शॅार्ट सर्किटने ही आग विझवल्याचे कारखानदाराने सांगितल्याचे अग्निशमन दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितले. दरम्यान कारखान्यात टॅावेलच्या निर्मितीसाठ वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थामुळे आग भडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com