सोलापुरात पहिला रुग्ण सापडलेला प्रभाग आठ सावरतोय ! आता उरले अवघे 18 रुग्ण 

तात्या लांडगे
Tuesday, 3 November 2020

प्रभागाविषयक ठळक बाबी...

 • आतापर्यंत 436 जण पॉझिटिव्ह
 • एकूण रुग्णांपैकी 386 रुग्ण झाले बरे
 • आतापर्यंत 23 रुग्णांचा झाला मृत्यू
 • प्रभागात आता उरले अवघे 18 रुग्ण

सोलापूर : शहरातील न्यू पाच्छा पेठ, जमखंडी पूल, दत्त चौक, लक्ष्मी मंडई, मल्लिकार्जून मंदिर, टिळक चौक, भुलाभाई चौक, कन्ना चौक या गजबजलेल्या प्रभागातील कोरोनाची स्थिती आता सावरु लागली आहे. याच प्रभागातील न्यू पाच्छा पेठेत पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर घरातील कर्ता अथवा ज्येष्ठ पुरुष कोरोनाचा बळी ठरु नये म्हणून 'कुटूंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत प्रभाग आठमध्ये घरोघरी जनजागृती करण्यात आली. त्यामुळे प्रभागात मागील पाच दिवसांत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आता या प्रभागातील 18 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

प्रभागाविषयक ठळक बाबी...

 • आतापर्यंत 436 जण पॉझिटिव्ह
 • एकूण रुग्णांपैकी 386 रुग्ण झाले बरे
 • आतापर्यंत 23 रुग्णांचा झाला मृत्यू
 • प्रभागात आता उरले अवघे 18 रुग्ण

 

शहरातील प्रभाग क्र. तीनमध्ये सर्वाधिक 39 मृत्यू झाले असून प्रभाग आठ आणि प्रभाग 24 मध्ये प्रत्येकी 32 रुग्णांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात मे महिन्यात 841 रुग्णांची भर पडली. जुलैमध्ये सर्वाधिक दोन हजार 676 रुग्ण आढळले. ऑगस्टमध्ये एक हजार 648, सप्टेंबरमध्ये एक हजार 807 रुग्ण शहरात आढळले. एकूण टेस्टच्या संख्येत पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण मे महिन्यात सर्वाधिक 12.64 टक्‍के होते. आता नोव्हेंबरच्या सुरवातीपासूनच हे प्रमाण 2.66 टक्‍क्‍यांवर आले आहे. महापालिका आयुक्‍तांच्या आदेशानुसार भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, व्यापारी, छोटे- मोठ्या व्यावसायिकांनीही कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. दुसरीकडे पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी बेशिस्त वाहनचालकांसह मास्क नसलेल्यांवर कारवाई सुरु केली आहे. तर बहुतांश नगरसेवकांनी त्यांचा प्रभाग कोरोनामुक्‍त करण्याचा निर्धार केला आहे. प्रभाग आठमधील नगरसेविका तथा माजी महापौर शोभा बनशेट्टी, सोनाली मुटकिरी, नगरसेवक अमर पुदाले व नागेश भोगडे यांच्या प्रयत्नातून कारोनाचा संसर्ग आता कमी झाल्याचे चित्र आहे. 

  सामाजिक बांधिलकीतून केली नागरिकांना मदत
  नागरिकांना मास्क वाटप करताना खबरदारी घेण्यासंदर्भात पत्रके वाटप केली. गरजूंना धान्य वाटप करीत त्यांना घरीच थांबण्यास सांगितले. त्यामुळे कन्ना चौक, तेलंगी पाच्छा पेठ, शनिवार पेठ, साखर पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, गुरुवार पेठ या परिसरातील रुग्णसंख्या आता कमी होऊ लागली आहे. 
  - सोनाली मुटकिरी, नगरसेविका

  मतदार याद्यावरुन घरोघरी पोहचविली मदत
  ऍन्टीजेन टेस्ट, फवारणी, होम क्‍वारंटाईन करण्यावर भर दिला. न्यू पाच्छा पेठेत पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर नागरिकांना दहा हजार किलो गहू, तांदूळ वाटप केले. औषधे, मास्क वाटप केले. नागरिकांनी आता नियमांचे पालन तंतोतंत करायला सुरवात केली आहे. त्यामुळे प्रभागातील कोरोना संसर्ग कमी होऊ लागला आहे. 
  - अमर पुदाले, नगरसेवक


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: The first patient found in solapur ward eight and this ward recoverd ! Now only 18 patients remain