बार्शी शहरात सोमवारपासून पाच दिवस जनता कर्फ्यू 

Five day public curfew in Barshi city from Monday
Five day public curfew in Barshi city from Monday

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या दहा दिवसांच्या संचारबंदीची मुदत ता. 26 रोजी संपताच पुढेचे पाच दिवस शहरात 31 जुलैपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली. 
बार्शी नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित बैठकीत आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अंकीत, तहसीलदार डी. एस. कुंभार, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, पोलिस उपअधिक्षक सिद्धेश्वर भोरे, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. शीतल बोपलकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड आदी उपस्थित होते. 
दहा दिवस संचारबंदीमुळे शहरात नागरिक, व्यापारी यांनी सहकार्य केले. लॉकडाउनमुळे कोरोना संसर्गाची साखळीस प्रतिबंध बसला असून रुग्णांच्या प्रमाणात घट होत आहे. आणखी पाच दिवस जनता कर्फ्यू केल्यास शहरात सुधारणा होऊ शकते. बंदमुळे आरोग्य प्रशासनाला रॅपिड अँटीजने टेस्ट राबवून जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी करता येईल. तसेच बाधित छुपे रुग्ण आढळून येतील. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवून कुटुंबातील संसर्ग, जनतेमध्ये होणारा संसर्ग कमी होईल, असे निकम यांनी स्पष्ट केले. 
आमदार राजेंद्र राऊत यांनी सामान्य नागरिकांना लॉकडाउनचा त्रास होत असून किराणा दुकान, बॅंक व्यवहार काही तासांसाठी सुरू करावेत अशी मागणी केली. या बैठकीला व्यापारी, किराणा, भांडे, स्टेशनरी कटलरी, मर्चंट, कापड असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांशी चर्चा करुन अखेर पाच दिवस जनता कर्फ्यू करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com