शहरात पाच मृत्यू ! 377 पैकी 54 व्यक्‍ती पॉझिटिव्ह; कुमठ्यातील 30 वर्षीय तरुणाचा कोरोनाने घेतला बळी

तात्या लांडगे
Tuesday, 29 September 2020

ठळक बाबी... 

  • मृत्यू अन्‌ रुग्ण संख्या वाढू लागली; टेस्टिंग मात्र 'जैसे थे'च 
  • आतापर्यंत शहरातील 79 हजार 509 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आज शहरातील 377 पैकी 54 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; पाचजणांचा मृत्यू 
  • शहरात आतापर्यंत 473 रुग्णांचा मृत्यू; बाधितांची संख्या आठ हजार 412 झाली 

 सोलापूर : शहरातील कोरोना बाधितांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. आज तब्बल पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तरीही टेस्टिंग वाढलेली नसून 377 संशयितांचीच टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 54 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज मृत्यू झालेल्यांमध्ये कुमठे (मजरेवाडी) येथील 30 वर्षीय पुरुष, 70 फूट परिसरातील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. शेटे नगरातील 61 वर्षीय महिला, उत्तर कसब्यातील 70 वर्षीय पुरुष आणि वज्रेश्‍वरी नगरातील (अक्‍कलकोट रोड) 72 वर्षीय महिलेचाही समावेश आहे.

 

ठळक बाबी... 

  • मृत्यू अन्‌ रुग्ण संख्या वाढू लागली; टेस्टिंग मात्र 'जैसे थे'च 
  • आतापर्यंत शहरातील 79 हजार 509 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आज शहरातील 377 पैकी 54 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; पाचजणांचा मृत्यू 
  • शहरात आतापर्यंत 473 रुग्णांचा मृत्यू; बाधितांची संख्या आठ हजार 412 झाली 

 

शहरात आज दमाणी नगर, सिव्हिल हॉस्पिटल क्‍वॉर्टर व रेसिडेन्स हॉस्टेल, सैफूल, जाई- जुई नगर, इंदिरा नगर, यामिनी नगर, आयटीआयजवळ, सोनामाता नगर, रामलिंग सोसायटी, राजस्व नगर, आयटीआयजवळ (विजयपूर रोड), वज्रेश्‍वरी नगर (अक्‍क्‍लकोट रोड), कुमठे, डब्ल्यूआयटी क्‍वॉर्टर, हुच्चेश्‍वर नगर (कुमठा नाका), 70 फूट रोड, गोली अपार्टमेंट, कोटणीस नगर, आसरा चौक, जुने आरटीओ कार्यालयाजवळ, आसरा चौक, दिक्षित नगर, भिमाशंकर नगर, आनंद नगर भाग-एक, आसरा सोसायटी, ताकमोगे वस्ती (मजरेवाडी), धमश्री लाईन, नवी पेठ, शांती नगर (भवानी पेठ), सिध्देश्‍वर पेठ, अभिषेक नगर, रविवार पेठ, फॉरेस्ट, उत्तर कसबा, कुमारस्वामी नगर (शेळगी), रेल्वे लाईन्स, गजानन अपार्टमेंट (आसरा), हेरिटेज अपार्टमेंट, सुयोग नगर, सिंधू विहार (जुळे सोलापूर), लक्ष्मी नगर, रोहिणी नगर, राघवेंद्र नगर (सैफूल), दक्षिण कसबा, पश्‍चिम मंगळवार पेठ याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five deaths in the solapur city; today 54 positive out of 377