Five hundred animals death in heavy rains in Mohol taluka
Five hundred animals death in heavy rains in Mohol taluka

मोहोळ तालुक्‍यात अतिवृष्टी, महापुराने पाचशे जनावरे मृत्यूमुखी 

Published on

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यात मंगळवारी रात्री ते बुधवारी दिवसभर झालेल्या पावसाच्या व पुराच्या पाण्याने 45 गावे बाधित झाली आहेत. तर लहान व मोठी मिळून 500 मृत्यूमुखी पडली आहेत. दरम्यान, पाणी ओसरताच तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. 
मंगळवार व बुधवारी दोन दिवस जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने नद्यांना पूर आला आहे. मोहोळ तालुक्‍यातील नदीकाठी व थोड्या अंतरावर असणाऱ्या 45 गावातील 410 घरात पाणी शिरले आहे. त्यामध्ये 410 कुटुंबातील 2019 नागरिकांचे एनडीआरएफच्या पथकाने व पोलिस प्रशासनाने रात्री नऊ वाजेपर्यंत परिश्रम घेऊन त्यांना सुरक्षितस्थळी हलविले. बाधित गावाकडे जाणारे नऊ रस्ते बंद झाले आहेत तर दोन रस्ते वाहून गेल्याने प्रशासनाला तिथपर्यंत जाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. 
पाणी घरात शिरल्याने 147 घरांची पडझड झाली आहे. 479 मोठी व 25 लहान जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. सध्या महसूल प्रशासनातील तलाठी व मंडल निरीक्षक हे आपापल्या सजाच्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. 

मोहोळ तालुक्‍यातील नुकसान 

  • बाधित गावे - 45 
  • घरात पाणी शिरलेली कुटुंबे - 410 
  • स्थलांतरित कुटुंबे - 410 
  • स्थलांतरित नागरीक - 2019 
  • वाहून गेलेले रस्ते - 2 
  • पडझड झालेली घरे - 147 
  • मृत्यू झालेली मोठी जनावरे - 479 
  • मृत झालेली लहान जनावरे -25 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com