दुसऱ्या लाटेपूर्वी वाढविली दंडाची रक्‍कम ! 60 वर्षांवरील व्यक्‍ती असलेले दुकान सात दिवस बंद; मास्क नसल्यास द्प्त्येकी पाचशे रुपयांचा दंड

तात्या लांडगे
Friday, 4 December 2020

सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट आता 15 डिसेंबरनंतर येईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी नवे आदेश काढून दंडाची रक्‍कम वाढविली आहे. मास्क नसलेल्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे. तर दुकानदारांनाही नियमांचे पालन करणे बंधनकाकरक केले असून 60 वर्षांवरील व्यक्‍ती दुकानात असू नये, पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती दुकानात तथा दुकानासमोर असू नयेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले.

सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट आता 15 डिसेंबरनंतर येईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी नवे आदेश काढून दंडाची रक्‍कम वाढविली आहे. मास्क नसलेल्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे. तर दुकानदारांनाही नियमांचे पालन करणे बंधनकाकरक केले असून 60 वर्षांवरील व्यक्‍ती दुकानात असू नये, पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती दुकानात तथा दुकानासमोर असू नयेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले. अन्यथा एक हजार रुपयांपर्यंत दंड आणि सात दिवसांसाठी दुकान बंद ठेवण्याचा इशाराही आयुक्‍तांनी आदेशातून दिला आहे.

 

आयुक्‍तांच्या आदेशानुसार...

  • मास्क न वापरल्यास द्यावा लागेल प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड
  • दुचाकीवर दोघांनी विनामास्क प्रवास केल्यास वाहनचालकास पाचशे रुपये द्यावे लागतील
  • दुचाकीवर तिघे विनामास्क असल्यास साडेसातशे रुपयांचा वाहनचालकास दंड
  • दुकानात तथा एखाद्या आस्थापनेत 60 वर्षांवरील व्यक्‍ती दिसल्यास दुकान सात दिवस बंद
  • दुकानात पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती आढळल्यास संबंधित दुकानदारास पाचशे ते एक हजार रुपयांचा दंड
  • होम क्‍वारंटाईनमधील नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांचा द्यावा लागणार दंड
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पाचशे रुपयांचा दंड; महापालिकेने तयार केली स्वतंत्र टिम

 

शहरातील आठ विभागीय अधिकारी, सफाई अधीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक, मंडई विभागातील मार्केट फी वसुली करणारे आणि मोकाट जनावरांच्या मालकांकडून दंड वसुली करणारे लिपिक, भूमी व मालमत्ता विभागाकडील महापिालका गाळे भाडे वसुली करणारे लिपिक, सामान फी व मांडव फी वसुलीचे कर्मचारी आणि अन्न व परवाना विभागाकडील संबंधित लिपिकांनी दंडात्मक कारवाई करावी, असेही आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे. आदेशानुसार नियमांचे पालन केले जाते का, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना पाचशे रुपयांचा आणि दुकानदार, व्यावसायिक, फिरत्या फळ व भाजी विक्रेत्यांनाही मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. दररोज केलेल्या कारवाईची माहिती संबंधितांनी महापालिका आयुक्‍तांना द्यावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five hundred rupees fine for not wearing mask! If a person above 60 years of age is seen in the shop, the shop will be closed for seven days