भाजप नगरसेवक कामाठीसह पाच जण दोन वर्षांसाठी तडीपार ! स्वाक्षरीविनाच पोलिस आयुक्‍तालयातून बाहेर पडली ऑर्डर 

तात्या लांडगे
Friday, 22 January 2021

स्वाक्षरीविनाच पाठविली ऑर्डर 
शहरातील गुंड प्रवृत्तीचे लोक तथा गुन्हेगारांसह काही नगरसेवकांना यापूर्वी शहर पोलिस आयुक्‍तालयाने हद्दपार तथा तडीपार केले आहे. काहींवर एमपीडीएअंतर्गत कारवाईदेखील केली आहे. त्यावेळी आयुक्‍तालयाच्या प्रेसनोटमध्ये पोलिस आयुक्‍त, उपायुक्‍तांसह परिमंडळ अधिकाऱ्यांची नावे असायची. मात्र, भाजप नगरसेवक सुनिल कामाठीसह अन्य चौघांना अवैधरित्या मटका व्यवसाय केल्याप्रकरणी दोन वर्षांसाठी सोलापूर, उस्मानाबाद जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यातून तडीपार करण्याचे आदेश आयुक्‍तालयाने आज काढले. या ऑर्डवर कोणत्याही अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसून कारवाई केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावेदेखील नसल्याचे दिसून येते. 

सोलापूर : शहरात अवैधरित्या मटका व्यवसाय चालविल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक सुनिल कामाठी (रा. न्यू पाच्छा पेठ), इस्माईल बाबू मुच्छाले (रा. मुस्लिम पाच्छा पेठ, जिंदाशा मदार चौक), शंकर चंद्रकांत धोत्रे (रा. भगवान नगर झोपडपट्टी), नवनाथ भिमशा मंगासले (रा. मुस्लिम पाच्छा पेठ), हुसेन सैपनसाब शेख (रा. मुस्लिम पाच्छा पेठ) हे मुंबई- कल्याण नावाचा अवैध मटका जुगार चालवत आहेत. त्यामुळे त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश आज पोलिस आयुक्‍तालयाने काढले आहेत.

स्वाक्षरीविनाच पाठविली ऑर्डर 
शहरातील गुंड प्रवृत्तीचे लोक तथा गुन्हेगारांसह काही नगरसेवकांना यापूर्वी शहर पोलिस आयुक्‍तालयाने हद्दपार तथा तडीपार केले आहे. काहींवर एमपीडीएअंतर्गत कारवाईदेखील केली आहे. त्यावेळी आयुक्‍तालयाच्या प्रेसनोटमध्ये पोलिस आयुक्‍त, उपायुक्‍तांसह परिमंडळ अधिकाऱ्यांची नावे असायची. मात्र, भाजप नगरसेवक सुनिल कामाठीसह अन्य चौघांना अवैधरित्या मटका व्यवसाय केल्याप्रकरणी दोन वर्षांसाठी सोलापूर, उस्मानाबाद जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यातून तडीपार करण्याचे आदेश आयुक्‍तालयाने आज काढले. या ऑर्डवर कोणत्याही अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसून कारवाई केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावेदेखील नसल्याचे दिसून येते. 

अवैधरित्या मटका व्यवसायप्रकरणी पोलिसांनी शंभरहून अधिकजणांविरुध्द कारवाई केली आहे. त्यातील कामाठी, मुच्छाले, धोत्रे, मंगासले, शेख या पाचजणांना सोलापूर, उस्मानाबाद जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यातून तडीपार करण्यात आले आहे. दोन वर्षांसाठी हे आदेश असल्याचेही पोलिस आयुक्‍तालयाने त्यांच्या आदेशातून स्पष्ट केले आहे. पोलिस उपायुक्‍त परिमंडळ कार्यालयातील वाचक अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक एन. एस. कानडे यांनी आदेश काढले. मात्र, त्यावर ना त्यांची ना कोणत्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five including BJP corporator Kamathi deported for two years! The order came out of the Commissionerate of Police without signature