
ठळक बाबी....
सोलापूर : शहरात आज 983 संशयितांमध्ये 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आनंदाची बाब म्हणजे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. दरम्यान, सिध्दी विनायक नगरात पाच रुग्ण आढळले असून विजयपूर रोडवरील प्रताप नगरात दोन रुग्ण आढळले आहेत.
ठळक बाबी....
शहरात आज द्वारका नगर, प्रताप नगर वस्ती (विजयपूर रोड), गीता नगर, कोंडा नगर, पद्म नगर हौसिंग सोसायटी (न्यू पाच्छा पेठ), एसआरपी कॅम्प, सिध्दी विनायक नगर (सैफूल), रोहिणी नगर, न्यू बुधवार पेठ, पॅराडाईज अपार्टमेंट (रेल्वे लाईन), सिंधू विहार (जुळे सोलापूर), दिपांजली अपार्टमेंट (होटगी रोड), न्यू लक्ष्मी चाळ (देगाव नाका) आणि वामन नगर (जुळे सोलापूर) याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. रुग्णांच्या संपर्कातील 89 संशयित सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर होम आयसोलेशनमध्ये 18 आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 53 संशयित आहेत. शहरातील 19 नंबर प्रभाग कोरोनामुक्त झाला असून 15 पेक्षा अधिक प्रभाग आता कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. महापिालका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या ठोस नियोजनामुळे आणि पोलिस प्रशासन, शिक्षक, महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे शक्य होऊ लागले आहे. दुसरीकडे सोलापुकरांनीही नियमांचे पालन करायला सुरवात केली आहे. व्यापारी, व्यावसायिकांकडूनही नियमांचे काटेकोर पालन होऊ लागल्याने शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे.