चिंता पुन्हा वाढली ! शहरात 48 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पाचजणांचा मृत्यू; 878 रिपोर्टमध्ये 69 व्यक्ती पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे 
Tuesday, 1 September 2020

शहरात आतापर्यंत कोरोनाने 417 व्यक्तींचा बळी घेतला आहे. त्यामध्ये 280 पुरुष तर 137 महिलांचा समावेश आहे. आज (मंगळवारी) शहरातील बॉम्बे पार्क (जुळे सोलापूर) येथील 48 वर्षीय पुरुषाचा, शास्त्री नगरातील 45 वर्षे पुरुष, सिद्धेश्वर पेठ (काडादी चाळ) येथील 27 वर्षीय तरुण, जुना देगाव नाका (साठे-पाटील वस्ती) येथील 37 वर्षीय पुरुष, तर मौलाली चौकातील 30 वर्षीय महिलेचा कोरोनाने आज बळी घेतला आहे.

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या पुन्हा एकदा उभारी घेऊ लागली आहे. आज 878 संशयितांच्या अहवालापैकी 69 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे चिंताजनक बाब म्हणजे 48 वर्षांखालील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एका 30 वर्षीय महिलेचा तर 27 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. 

सिद्धेश्वर पेठ (काडादी चाळ), शास्त्रीनगर, साठे- पाटील वस्ती, मौलाली चौक, दक्षिण कसबा, इंद्रधनू अपार्टमेंट (भय्या चौक), प्रतापनगर ग्रीनजवळ, वैष्णवी नगर (सैफुल), गणेश पेठ (कौतम चौक), पूर्व मंगळवार पेठ, अवंती नगर, भावना ऋषी नगर (आकाशवाणी केंद्राजवळ), निराळे वस्ती, अभिमन्यू नगर (मुररजी पेठ), शुक्रवार पेठ, चाटी गल्ली, भारतरत्न इंदिरा नगर, न्यू पाच्छा पेठ,सुशील नगर (भारती विद्यापीठाजवळ), वसंत विहार, शिक्षक कॉलनी (मौलाली चौक), बल्लारी चाळ (जुना देगाव नाका), लोकमान्य हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), आसरा सोसायटी (होटगी रोड), शिवगंगा नगर (नई जिंदगी), राजस्व नगर (विजयपूर रोड), हरिपदम रेसिडेन्सी (सम्राट चौक), राजमाता गार्डनजवळ (नितीन नगर), कर्णिक नगर, विजय नगर, वृंदावन सोसायटी (आरटीओ कार्यालयाजवळ), भैरू वस्ती (सुशील नगरजवळ), रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ, सुयोग सृष्टी अपार्टमेंट (रविवार पेठ), रत्नदीप नगर (कंबर तलावाजवळ), गणेश पेठ, काडादी हायस्कूल जवळ (भवानी पेठ), निर्मिती विहार, जोशी गल्ली (शेळगी), जुना मेडिकल कॉलेज जवळ, लोकमान्य हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), दक्षिण सदर बझार, शामा अपार्टमेंट (रेल्वे लाईन), रुबी नगर आनी राजेश कोठे नगर (रंगराज नगरजवळ) येथे आज नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील 64 हजार 971 संशयीत व्यक्तींची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरातील रुग्णसंख्या झाली सहा हजार 712; आतापर्यंत 417 जणांचा मृत्यू 
  • आतापर्यंत पाच हजार 508 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • सद्य:स्थितीत शहरातील 787 रुग्णांवर सुरू आहेत विविध रुग्णालयांमध्ये उपचार 

"येथील' रुग्ण ठरले कोरोनाचे बळी 
शहरात आतापर्यंत कोरोनाने 417 व्यक्तींचा बळी घेतला आहे. त्यामध्ये 280 पुरुष तर 137 महिलांचा समावेश आहे. आज (मंगळवारी) शहरातील बॉम्बे पार्क (जुळे सोलापूर) येथील 48 वर्षीय पुरुषाचा, शास्त्री नगरातील 45 वर्षे पुरुष, सिद्धेश्वर पेठ (काडादी चाळ) येथील 27 वर्षीय तरुण, जुना देगाव नाका (साठे-पाटील वस्ती) येथील 37 वर्षीय पुरुष, तर मौलाली चौकातील 30 वर्षीय महिलेचा कोरोनाने आज बळी घेतला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five people under the age of 48 died of corona in the city