माढा मतदारसंघातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार साडेचार कोटींची कर्जमाफी ! 

Karjmafi
Karjmafi
Updated on

टेंभुर्णी (सोलापूर) : मागील वर्षी माढा मतदारसंघातील माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्‍यामध्ये अतिवृष्टी झाल्याने व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या 666 शेतकऱ्यांची एकूण 4 कोटी 53 लाख रुपयांची कर्जमाफी झाली असून, ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. 

मागील वर्षी जुलै व ऑगस्टमध्ये सोलापूर जिल्ह्यासह पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे माढा मतदारसंघातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्‍यातील 43 गावांना या पुराचा फटका बसून शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आमदार बबनराव शिंदे यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत मदत देण्याची मागणी शासनाकडे केली होती. बाधित शेतकऱ्यांना आघाडी सरकारने संबंधित पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी योजना जाहीर केलेली होती. गतवर्षीच्या महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम शासनाकडून प्राप्त झाली आहे. येत्या चार दिवसांत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. 

माढा तालुक्‍यातील 12 गावांतील 182 पूरग्रस्त शेतकऱ्यांना 1 कोटी 16 लाख 20 हजार 43 रुपये एवढ्या रकमेची कर्जमाफी मिळणार आहे. शेतकऱ्यांची खाती असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅंक, राष्ट्रीय बॅंक, व्यापारी बॅंक यामधील खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. माढा तालुक्‍यातील बेंबळे, मिटकलवाडी, रुई, आलेगाव (बु), रांझणी, वडोली, चांदज, आलेगाव (खु), टाकळी (टे), माळेगाव, शेवरे, गारअकोले तसेच पंढरपूर तालुक्‍यातील 22 गावांतील 306 पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2 कोटी 16 लाख 24 हजार 714 रुपये एवढी कर्जमाफी मिळालेली असून त्यामध्ये अजनसोंड, देगाव, शेगाव दुमाला, सुस्ते, सांगवी, खेडभोसे, भोसे (तरटगाव), पेहे, उंबरे (पागे), करोळे, कान्हापुरी, पिराची कुरोली, वाडीकुरोली, चिंचोली (भो), गुरसाळे, भटुंबरे, बादलकोट, ईश्वरवठार, व्होळे, नांदोरे, देवडे, पटवर्धन कुरोली व माळशिरस तालुक्‍यातील 9 गावांतील 178 पूरग्रस्त शेतकऱ्यांना 1 कोटी 20 लाख 79 हजार रुपये कर्जमाफी झाली असून, त्यामध्ये लवंग, वाघोली, मिरे, नेवरे, उंबरे (वे), महाळुंग, जांभूड, वाफेगाव, खळवे या गावांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. 

पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा याबाबत मी फेब्रुवारी 2020 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून मदत देण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा फायदा देण्यासाठी शासनाकडून निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. शासनाकडून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाल्यामुळे माढा मतदारसंघासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी 15 कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे. 
- आमदार बबनराव शिंदे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com