जीव भांड्यात ! कामती परिसरात बिबट्या नव्हे, तरस; वनविभागाचे स्पष्टीकरण

श्रावण तीर्थे 
Monday, 7 September 2020

शनिवारी (ता. 5 ) रात्री साडेदहाच्या सुमारास कामती- मंगळवेढा रोडलगत कुंभारवस्ती परिसरात बिबट्यासदृश प्राणी आढळून आला. याबाबत कुंभार वस्तीवरील लक्ष्मण जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्या शेतालगत हा प्राणी गावातील महबूब भगवान व शशिकांत पाटील यांना दिसला. त्यांनी फोनवरून परिसरातील 20 ते 25 लोक जमा केले. त्यानंतर बॅटरीच्या साह्याने त्याला शोधत असताना तो एका द्राक्ष बागेतून पसार झाला. 

कोरवली (सोलापूर) : गेल्या दोन महिन्यांपासून मोहोळ परिसरात बिबट्यासदृश प्राण्याची दहशत असतानाच, शनिवारी (ता. 5) रात्री मोहोळ तालुक्‍याच्या दक्षिण भागात कामती - वाघोली परिसरात बिबट्या आढळून आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी त्याचा व्हिडीओ काढून वनविभागाला दाखवला असता, वनविभागाने "तो' प्राणी बिबट्या नसून, तरस असल्याचे सांगितल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला. 

मोहोळ शहर व परिसरात बिबट्याचा वावर सुरू असल्याच्या वृत्ताने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र शनिवारी (ता. 5 ) रात्री साडेदहाच्या सुमारास कामती- मंगळवेढा रोडलगत कुंभारवस्ती परिसरात बिबट्यासदृश प्राणी आढळून आला. याबाबत कुंभार वस्तीवरील लक्ष्मण जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्या शेतालगत हा प्राणी गावातील महबूब भगवान व शशिकांत पाटील यांना दिसला. त्यांनी फोनवरून परिसरातील 20 ते 25 लोक जमा केले. त्यानंतर बॅटरीच्या साह्याने त्याला शोधत असताना तो एका द्राक्ष बागेतून पसार झाला. या सर्व घटनेचे पांडुरंग कुंभार यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण करून वनविभागाला पाठवले. वनविभागाने चित्रीकरण पाहिले असता तो बिबट्या नसून तरस असल्याचे सांगितले. 

चित्रीकरण पाहिल्यानंतर वनरक्षक सुनील थोरात यांनी सांगितले, की व्हिडीओमध्ये दिसणारा प्राणी हा बिबट्या नसून तरस आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The forest department clarified that the animal found in Kamati area was not a leopard but a wild dog