esakal | पांडे येथील 35 फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचा अथक प्रयत्नांनंतर वाचवला जीव ! 

बोलून बातमी शोधा

Fox}

पांडे (ता. करमाळा) येथील एका शेतातील 35 फूट खोल विहिरीत रविवारी (ता. 4) कोल्हा पडला. वनविभागाने केलेल्या एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. 

पांडे येथील 35 फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचा अथक प्रयत्नांनंतर वाचवला जीव ! 
sakal_logo
By
दस्तगीर मुजावर

पांडे (सोलापूर) : पांडे (ता. करमाळा) येथील एका शेतातील 35 फूट खोल विहिरीत रविवारी (ता. 4) कोल्हा पडला. वनविभागाने केलेल्या एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. 

पांडे गावात कोल्हा लांडगा, ससा, हरण, रानडुक्कर आदी प्राण्यांचा नेहमी वावर असतो. मात्र रविवारी सकाळी येथील सेवानिवृत्त प्रा. बुवा माने नेहमीप्रमाणे शेतामध्ये सकाळी फिरत असताना त्यांना चिरेबंदी विहिरीतून एका प्राण्याचा विव्हळण्याचा आवाज आला. यामुळे कुतूहलापोटी प्रा. माने यांनी पाण्याने भरलेल्या विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यात कोल्हा पडलेला दिसला. त्या वेळी प्रा. माने यांनी पत्रकार दस्तगीर मुजावर व सुनील भोसले यांना फोन करून याची माहिती दिली. त्या वेळी त्यांनी वनपाल दीपाली शिंदे यांना संपर्क साधून माहिती दिली. 

वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र यश येत नव्हते. शेवटी एका क्रेटला दोर बांधून क्रेटच्या साहाय्याने कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. कोल्ह्याचा जीव वाचला. खोल विहिरीत पडल्याने कोल्हा किरकोळ जखमी झाला होता. या वेळी वनक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, वनपाल दीपाली शिंदे, वनरक्षक गणेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली एक तास प्रयत्नांनंतर कोल्ह्याला बाहेर काढण्यात यश आले. या वेळी वन कर्मचारी मजनू शेख, रघुनाथ रेगुडे, सुनील भोसले, प्रा. बुवा माने, बळिराम माने, दस्तगीर मुजावर आदी उपस्थित होते.

कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढल्याने कोल्ह्याचा जिव वाचला. त्याला त्याच्या सुरक्षित अधिवासाच्या ठिकाणी सोडण्यात आले. 1 ते 7 ऑक्‍टोबर यादरम्यान राज्यात वन्यजीव सप्ताह साजरा होत असताना कोल्ह्याचा जीव वाचवल्याने ग्रामस्थांनी अभिनंदन केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल