वनविभागाचे अधिकारी म्हणाले, जनावरांवर बिबट्याचा हल्ला नाहीच ! अफवा पसरविणाऱ्यांवर होईल कारवाई 

Bibtya_taras.
Bibtya_taras.
Updated on

सोलापूर : करमाळा भागात 3 मार्चपासून आतापर्यंत सोलापूर वन विभागाने बिबट्या या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत थर्मल ड्रोन, डॉग स्कॉड सर्चिंग, डेली पगमार्क डेटा ऍनालेसिस व ऑन स्पॉट कॉल व्हेरिफिकेशन आणि 14 गस्ती पथकांच्या माध्यमातून बिबट्याचे सर्च ऑपरेशन सुरू ठेवले आहे. याचबरोबर कॅमेरा ट्रॅप, पिंजरे, बेशुद्धी पथक - दोन, शार्प शूटर टीम, एसआरपीएफ, पोलिस पथक यांना पाचारण करण्यात आलेले आहे. मात्र, जनावरांवर केलेला हल्ला बिबट्याने नव्हे तर तरस अशा प्राण्याने केला आहे, असे सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले आहे. 

लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व वन कर्मचारी अहोरात्र घरोघरी पोचून लोकांमध्ये बिबट्या या वन्य प्राण्याविषयी जनजागृती सुरू केले असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील एक आठवडा नरभक्षक बिबट्याविषयी लोकांमध्ये गैरसमज व अफवांचे निराकरण करण्याचे प्रयत्न वन विभाग करत आहे. बऱ्याच ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे म्हणून तरस, कुत्रे व इतर वन्य प्राण्यांचे ठसे अथवा चित्रफिती या प्रसार मध्यमांमध्ये येत आहेत. तरी लोकांनी इंटरनेटच्या मध्यमातून बिबट्याचे ठसे व त्याची माहिती घेत जुन्या व खोट्या चित्रफिती यांची शहानिशा करावी व नंतरच विश्वास ठेवावा. 

सोमवारी (ता. 14) भिवरवाडी (ता. करमाळा) येथील गायीवर झालेला हल्ला हा तरस या वन्य प्राण्याने केला असून ते तेथे मिळालेल्या केसाच्या सॅम्पल व पायांच्या ठशांवरून सिद्ध होते. तरी सर्व लोकांनी अफवांवर विश्वासू ठेऊ नये. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी; अन्यथा ते कारवाईस पात्र ठरतात, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Ganesh Mandal News
Pune Teachers Constituency
Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Marathi News Esakal
www.esakal.com