esakal | माजी पालकमंत्री म्हणाले, बोरामणी विमानतळाला लागतील दहा वर्षे 
sakal

बोलून बातमी शोधा

vijaykumar deshmukh

सरकार बदलल्यानंतर बदलला प्राधान्यक्रम 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडाण योजनेत सोलापूरचा समावेश केला होता. योजनेत समावेश झाला परंतु सोलापुरातून विमान उडण्यासाठी होटगी रोडवरील विमानतळाला सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीचा प्रमुख अडथळा ठरत आहे. अडथळा ठरणारी चिमणी हटवावी असे आदेश उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्यातील सरकार बदलले आणि विमानतळ व विमानसेवेचा प्राधान्यक्रमही बदलला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने होटगीरोडवरील विमानतळाला प्राधान्य दिले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्राधान्य दिले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी बोरामणी विमानतळासाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

माजी पालकमंत्री म्हणाले, बोरामणी विमानतळाला लागतील दहा वर्षे 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापुरातील विमानसेवा सुरू नसल्याने या ठिकाणी नव्याने उद्योग येऊ शकत नाहीत. नवीन उद्योग नसल्याने सोलापुरातील रोजगार नाही. सोलापुरातील विमानसेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत आहे. होटगीरोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याऐवजी राज्यातील सरकार बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्राधान्य देऊ लागले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातून बोरामणी विमानतळाला मिळालेला निधी तुटपुंजा असून ऐवढाच निधी मिळत राहिला तर पुढील 10 वर्षांतही बोरामणीचे विमानतळ पूर्ण होणार नसल्याचे मत सोलापूरचे माजी पालकमंत्री व भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले आहे. 
हेही वाचा - आमदार भालकेंच्या पाठपुराव्याला दहा वर्षाने यश 
आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, सोलापूर शहरातील वाढती वाहतूक, वारंवार होणारे अपघात यातून मार्ग काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहरासाठी उड्डाणपूल मंजूर केले होते. या पुलासाठी सरकारने 300 कोटी रुपये मंजूर करून त्यातील पहिल्या हप्त्याची रक्कमही दिली होती. सोलापुरातील उड्डाणपुलाला सोलापुरातील कॉंग्रेसच्या स्थानिक आमदाराचा विरोध असल्याने या पुलासाठी आजच्या अर्थसंकल्पात तरतूद झालेली नाही. सोलापूरकरांना जे अपेक्षित होते ते या अर्थसंकल्पातून मिळाले नाही. सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्राला चालना देण्यासाठी आजच्या अर्थसंकल्पात ठोस काही नसल्याचेही त्यांनी सांगितले.

go to top