माळशिरस तालुक्‍याचे माजी आमदार श्‍यामराव पाटील यांचे निधन 

Shyamrao Patil
Shyamrao Patil
Updated on: 

बोंडले (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍याचे माजी आमदार श्‍यामराव भीमराव पाटील (पानीवकर) यांचे आज (गुरुवारी) दुपारी चार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. सोलापूर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील व प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुनील पाटील यांचे ते वडील होत. 

अतिशय संघर्षपूर्ण राजकीय घडामोडीत श्‍यामराव पाटील 1977 मध्ये माळशिरस तालुक्‍याचे आमदार झाले. आपल्या कल्पक बुद्धिमत्ता व दूरदृष्टीमुळे 1972 मध्ये त्यांनी श्रीराम सिनेमाच्या माध्यमातून तालुक्‍यात मनोरंजनाची मुहूर्तमेढ रोवली, जे आजही भारतातील मोजक्‍या उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या थिएटरमध्ये गणले जाते. ग्रामीण भागातील गरीब व होतकरू मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी 1991 मध्ये श्रीराम शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची गंगा माळशिरस तालुक्‍यात आणली. आज त्याचा मोठा वटवृक्ष झाला आहे.

त्यांच्या निधनामुळे पानीवकरांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता कृषी महाविद्यालय, पानीव (पानीव - खुडूस रोड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Division Teachers Constituency
Drought Relief for Maharashtra Farmers Limited to Two Hectares as Officials Survey Crop Damage Across 265 Talukas
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods
Marathi News Esakal
www.esakal.com