किराणा दुकानात सिगरेट मिळेल का? कोणी विचारले वाचा 

प्रशांत देशपांडे 
रविवार, 29 मार्च 2020

कोरोना व्हायरसचा पादुर्भव रोखण्यासाठी सोलापूर शहरात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे शहरातरल हॉटेल, पार्क चौपाटी, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या दुकाने बंद आहेत. फक्त आत्यावश्‍क सुविधा मधील मेडिकल दुकाने, किराणा दुकाने आणि दवाखाने सुरू आहेत.

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्रातही संचारबंदी लागू आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद आहेत. खाद्यपदार्थांच्या हॉटेलसह पानटरी सुध्दा बंद आहेत. त्यामुळे व्यसनीबहाद्दरांची मोठी अडचण झाली आहे. किराणा दुकानात सुद्धा ते त्यांचे व्यसन पूर्ण करणाऱ्या वस्तू मागू लागले आहेत. अशाच एका व्यसनीबहाद्दराला मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यातच सोलापुरातील लष्कार भागात एक माजी आमदार व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासाठी किराणा दुकानासमोर थांबले होते. त्यांनी त्यांना जे हवं होतं ते तिथे विचारले, पण हे किराणा दुकान असल्याचे सांगीतल्यानंतर त्यांची गाडी मार्गस्थ झाली. 
कोरोना व्हायरसचा पादुर्भव रोखण्यासाठी सोलापूर शहरात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे शहरातरल हॉटेल, पार्क चौपाटी, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या दुकाने बंद आहेत. फक्त आत्यावश्‍क सुविधा मधील मेडिकल दुकाने, किराणा दुकाने आणि दवाखाने सुरू आहेत. आठ दिवसांपासून पानटपरी, दारूची दुकाने सुध्दा बंद आसल्याने व्यसन करणाऱ्या माणसांची तारांबळ उडाली आहे. आसच नाही तर या संचारबंदीचा फटका  माजी आमदारांना बसल्याचे चित्र पहायला मिळाले. माजी आमदारांची गाडी दुपारी आचानक लष्करमधील एका दुकानासमोर थांबली. आणि त्या माजी आमदारांनी गाडीच्या खिडकीची काच खाली करत सिगरेट मिळले का आसे विचारले, नाही आसे सांगितल्यावर गाडी पुढे गेली. मात्र, तेवढ्यात एका महाशयाने सोलापुरातील विजापुर वेसमध्ये मिळेल असं सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA in Solapur asks for a cigarette at the grocery store