
सोलापूर ः लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे असलेल्या सात मध्यम प्रकल्पांपैकी चार मध्यम प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा "मायनस'मध्ये गेला आहे. एकूण सात मध्यम प्रकल्पात सध्या सहा टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मान्सून यंदा लवकरच येणार असल्याने पाणीटंचाईची स्थिती जाणवणार नसल्याचे दिसून येते.
लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे सात मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी चार प्रकल्प उन्हाळ्याच्या शेवटी मायनसमध्ये गेले आहेत. मागील वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्प भरले होते. त्याचा चांगला परिणाम झाल्याने यंदा भीषण उन्हाळ्याची तीव्रता जाणवली नाही. आता मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे यंदा पाऊसही लवकर सुरु होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा जरी मायनसमध्ये गेला असला तरी त्याचा भीषणता जाणवून येत नाही. सोलापूर शहराच्या जवळ असलेला एकरुख, बार्शी तालुक्यातील जवळगाव व मोहोळ तालुक्यातील आष्टी या तिन्ही मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाण्याची टक्केवारी अधिकमध्ये आहे. या मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्याचा उपयोग प्रामुख्याने, पिण्यासाठी, शेतीच्या पाण्यासाठी केला जातो. त्यामुळे या प्रकल्पांकडे सर्वांचे लक्ष असते. पाणीसाठा चांगला असल्यामुळे उन्हाळ्याची तीव्रताही जाणवली नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. बार्शी तालुक्यातील हिंगणी, पिंपळगाव ढाळे, अक्कलकोट तालुक्यातील बोरी तर करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा मायनसमध्ये गेला आहे. या प्रकल्पांचा पाणीसाठा मायनसमध्ये गेल्याने त्या परिसरातील शेतीपिकांना त्याचा फटका बसणार आहे. त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी बागायती पिके शेतामध्ये घेतलेली असतात. पण, प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने त्याचा आर्थिक संबंधित शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे असलेल्या उजनी धरणातून सध्या कालवा व बोगद्याच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी सोडणे सुरुच आहे. कालव्यात 2525 क्सुसेक तर बोगद्यातून 400 क्सुसेक एवढे पाणी सोडले जात आहे. 30 मे पर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने केले होते. मात्र, अद्यापही पाणी सुरु असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धरण शंभर टक्याच्यावर भरल्याने यंदा पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन झाल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.